प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 276 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 379 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
379 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 75, कराड येथील 16, फलटण येथील 8, कोरेगाव येथील 60, वाई येथील 29, खंडाळा येथील 12, रायगाव येथील 30, पानमळेवाडी येथील 51, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 6, खावली येथील 21 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 56 असे एकूण 379 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 167340
एकूण बाधित — 42698
घरी सोडण्यात आलेले — 34774
मृत्यू — 1408
उपचारार्थ रुग्ण — 6516
Previous Articleपुराच्या पाण्यात दुचाकी घालणे पडले महागात
Next Article मटका अड्ड्यांवर बोरगाव पोलिसांची कारवाई









