सातारा / प्रतिनिधी
जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
11 बाधितांचामृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे अतित ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, राजुरी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, विडणी ता. फलटण येथील 52 वर्षीय महिला, धामणी ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील खासगी हॉस्पीटल येथे मोरजीवाडा चिखली ता. वाई येथील 55 वर्षीय महिला, पाटण येथील 86 वर्षीय पुरुष, शिंदूजर्णे ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, कराड खासगी हॉस्पीटमध्ये शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, मारुल हवेली ता. पाटण येथील 76 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये वळसे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष असे एकूण 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने — 38707
एकूण बाधित — 9008
घरी सोडण्यात आलेले — 4918
मृत्यू — 288
उपचारार्थ रुग्ण — 3802









