सातारा /प्रतिनिधी
जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 261 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 5 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी दिली.
5 जणांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कंधारवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुषाचा, कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये विठ्ठलनगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 84 वर्षीय महिला व वाजेगाव ता. पाटण येथील 72 वर्षीय महिला तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे शनिवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय पुरुषाचा असे एकूण 5 कोरोना बाधितांतचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी सांगितले.