सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असून, त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने जिल्हृयात एकूण 3 हजार 523 बेड्स उपलब्ध आहेत. यापैकी जिल्हा रुग्णालयात एकूण 1 हजार 128 बेड असून, त्यापैकी 95 बेड व्हेंटेलेटरचे व 164 व्हेंटेलेटरशिवाय बेड आहेत. तसेच 728 ऑक्सिजनचे व 141 ऑक्सिजनरहीत बेड आहेत.
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 1 हजार 528 बेड असून, त्यापैकी 109 बेड व्हेंटेलेटरचे आहेत व 134 व्हेंटेलेटरशिवाय बेड आहेत. तसेच 1010 ऑक्सिजनचे व 275 ऑक्सिजनरहीत बेड आहेत. जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 867 बेड आहेत. असे एकूण 204 व्हेंटेलेटर बेड, 298 व्हेंटेलेटरशिवाय बेड, 1738 ऑक्सिजनचे व 1283 ऑक्सिजनरहीत बेड आहेत.