प्रतिनिधी / सातारा
राज्यातील सर्व मंदिरे सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे जिल्ह्यात घंटानाद आंदोलन करण्यात आले.सातारा शहरात 11 ठिकाणी हे आंदोलन झाले.मंदिरे सुरू करण्याचे निवेदन घंटा वाजवून झाल्यावर प्रशासनाला देण्यात आले.ग्रामीण भागात ही भाजपने आंदोलन केले.जिल्ह्यातील विविध मंदिरात आंदोलने करतेवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निषेध करण्यात आला.
सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे खुली करावीत या मागणीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.सातारा शहरात 11 ठिकाणी आंदोलन करण्यात आले.त्यामध्ये काळाराम मंदिर, समर्थ मंदिर, राजवाडा येथील हनुमान मंदिर, सदर बाजार येथील मंदिर अशा मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.पोवई नाका येथे ही आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, प्रवीण शहाणे, हेमांगी जोशी, नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तारळे भागात जळव येथे आंदोलन
जळव जोतीबा मंदिर ता.पाटण या ठिकाणी भाजपाच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात माजी जि.प.सदस्य रामभाऊ लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी समिती सदस्य नितीन जाधव, अनिल माने, सुहास सणगर, लहुराज पवार, सचिन देटके, राजेंद्र जाधव, घाडगे फौजी, रविंद्र लाहोटी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









