प्रतिनिधी / सातारा
गेल्या तीन महिन्यापासून सुरु असलेली कोरोनाविरुध्दची लढाई तिसर्या टप्प्यात असताना आता बाधितांची एकूण संख्या दहा हजाराच्या पार झाली आहे. ऑगस्ट अखेरीस बाधितांची संख्या दहा हजारकडे जाईल, त्यातील निम्मे कोरोनामुक्त असतील या जिल्हा प्रशासनाच्या कोरोना स्थिती बाबतच्या अंदाजाबाबत ‘तरुण भारत’ ने वृत्त प्रसिध्द केले होते. मात्र आठवडाभर अगोदरच बाधितांची संख्या दहा हजारांनजीक पोहोचली आहे तर त्यातील निम्मे कोरोनामुक्त आहेत. मात्र, मृतांचा आकडा 306 झाला असून वाढता मृत्यूदर रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सातारा तालुक्यातील निगडी येथील राजेवाडीत हाहाकार माजला असून तिथे एका दिवसात 81 जण बाधित समोर आले आहेत.
दरम्यान, जिह्यात काल शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार 342 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तर रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात एकूण 443 जणांचा अहवाल बाधित आला आहे. तर जिल्हय़ातील 157 एवढय़ा नागरिकांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील 157 जणांची कोरोनावर मात
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये *जावली* तालुक्यातील 4, *कराड*तालुक्यातील 7, *खंडाळा* तालुक्यातील 19, *खटाव* तालुक्यातील 7, *कोरेगाव* तालुक्यातील 4,*महाबळेश्वर* तालुक्यातील 1, *माण* तालुक्यातील 1, *पाटण* तालुक्यातील 3, *फलटण* तालुक्यातील 30, *सातारा* तालुक्यातील 76, वाई तालुक्यातील 5 असे एकूण 157 नागरिकांचा समावेश आहे.
श्रीगणेश चरणी भक्तांचे साकडे
मृतांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक असून आता वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेत जिल्हय़ाला लवकर कोरोनामुक्त करण्याची प्रार्थना नागरिक श्री गणेशचरणी करत आहेत. कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढते प्रमाण या गंभीर परिस्थितीत दिलासा देत आहे. जिल्हय़ात सध्या एकूण 932 जण होम आयसोलेट आहेत. तपासण्या वाढल्याने बाधितांचा आकडा वाढत असला तरी आतापर्यंत 40 हजारांच्यावर तपासण्या झाल्या आहेत त्यामध्ये एकूण बाधितांचा आकडा 9 हजार 714 आहे व त्यापैकी 5 हजार 675 म्हणजे निम्म्याहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राजेवाडीत एका दिवसात 81 बाधित
सातारा तालुक्यातील निगडी येथील राजेवाडी येथे दि. 9 रोजी गोंधळाचा कार्यक्रम होता.त्याकरता 30 जण जमले होते. पुण्यावरून दोघी कार्यक्रमाला आल्या होत्या. त्या दि. 23 रोजी पॉझिटिव्ह आल्या होत्या. पहिला बाधित दि. 16 रोजी आढळून आला होता. त्याला दि. 12 रोजी ताप आला होता.त्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते त्यांचा दि. 16 रोजी मृत्यू झाला. दि. 17 रोजी मृत व्यक्तीच्या घरातील 12 जणांचे रॅपिड टेस्ट घेतल्या. त्यातील 6 जण बाधित आले. तेथिलच दुसरी व्यक्ती दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता मृत झाली. त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात अंत्यविधीला नेण्यात आले होते. मृत व्यक्तीच्या घरातील आठजणांचे स्वाब दि. 20 रोजी घेतले होते. त्यामधील 6 जण बाधित आले. गावातले 150 जणांचे स्वाब दि.21 रोजी घेतले होते. दि. 23 रोजी 81 जण पॉझिटिव्ह आले. आजअखेर कोरोना आकडा 105 झालेला आहे. निगडी गाव संपुर्ण सील करण्यात आले आहे.
मृत बाधितांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव 72 वर्षीय पुरुष, कार्वे ता. कराड 77 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सातारा 59 वर्षीय महिला, मोरघर ता. जावली 65 पुरुष, उडतारे ता. वाई 64 वर्षीय पुरुष व कराड 72 वर्षीय पुरुष, डिसीएच फलटण येथे तरडफ ता. फलटण 81 वर्षीय पुरुष व रविवार पेठ फलटण 64 वर्षीय पुरुष, तसेच साताऱयात खाजगी हॉस्पिटलमध्ये मंगळवार पेठ सातारा 87 वर्षीय महिला व तारळे ता. पाटण 78 वर्षीय महिला असे एकूण 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. यामध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक असून त्यांची काळजी प्रशासनासह नागरिकांना घ्यावी लागणार आहे.
कोरोनाशी लढायचे आहे, रुग्णाशी नाही
जिल्हय़ात होम आयसोलेशन सुरु करण्यात आल्यानंतर बाधित अहवाल आलेले पण सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेले 962 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे हॉस्पिटल्समधील ताण कमी होत असला तरी आरोग्य विभागाचे काम दुपटीने वाढले आहे. कोरोना 7 ते 10 दिवसात बरा होतो. त्यामुळे होम आयसोलेशनचा पर्याय बाधित आलेले पण लक्षणे नसलेले नागरिक वापरत असून त्यांनी स्वतः नियम पाळायचे आहेतच मात्र, अशा होम आयसोलेट रुग्णांना शेजारी, नातेवाईकांनी मदतीचा हात द्यावयाचा आहे. कोरोनाविरुध्द लढायचे आहे, रुग्णाबरोबर नाही हे आता सर्वांनीच लक्षात घेणे गरजेचे आहे.
तालुकानिहाय होम आयसोलेशनमधील संख्या
होम आयसोलेशन करण्यासाठी लक्षणे नसलेल्या बाधित नागरिकांना परवानगी दिली जात आहे. हा कालावधी 10 दिवसांचा असून आरोग्य विभाग त्यांच्याशी 24 तास कनेक्ट असून तालुकानिहाय होम आयसोलेट असलेल्यांमध्ये सातारा 299, कराड 297, कोरेगाव 101, वाई 72, पाटण 51, फलटण 40, महाबळेश्वर 34, खंडाळा 25, खटाव 20, माण 15, जावली 8 यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.
शनिवारी रात्रीच्या अहवालात 342 बाधित
*कराड तालुका 83 बाधित :* सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 2, मलकापूर 1, रविवार पेठ 1, ओंड 1, कराड 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 3, सुपने 1, रेठरे बु. 2, जुळेवाडी 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 3, काले 1, उंब्रज 2, कोयना वसाहत 1, वडगाव हवेली 1, बनवडी 2, काळगाव 1, मंगळवार पेठ 1, बाहे 1, मलकापूर 1, पाल 4, कराड 7, टेंभू 1, कोपर्डे 1, किवळ 1, कोडोली 2, शिवाजीनगर 1, रविवार पेठ 4, वाठार खु. 1, गोटे 2, रेठरे खु. 1, वनवासमाची 1, शेरे 1, पोटाळे 1, चचेगाव 1, सोमवार पेठ 1, उंडाळे 1, उपजिल्हा रुग्णालय 5 कार्वे 2, जुळेवाडी 1. गुरुवार पेठ 1, ओगलेवाडी 1, खुबी 2, बनवडी 6, रेठरे खु. 1, आगाशिवनगर 1, विद्यानगर 1, शनिवार पेठ 2.
*सातारा तालुका 83 बाधित :* मंगळवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 2, यादोगोपाळ पेठ 1, दुर्गापेठ 1, धतमार्ली 1, विलासपूर 1, गोडोली 1, पिरवाडी 1, विकासनगर 1, गुरुवार पेठ 1, सातारा 7, सदरबझार 3, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, गणेशवाडी 6, कामाठीपुरा 1, करंजे 1, कृष्णानगर 1, चिमणपुरा पेठ 1, मल्हारपेठ 1, कोळवडी 1, सदरबझार 2, शनिवारपेठ 2, सिव्हिल हॉस्पिटल 1, मोती चौक 1, गुरुवार पेठ 1, संगममाहुली 1, जुनी एमआयडीसी 1, नागठाणे 1, गोळीबार मैदान 1, गोडोली 2, गोळीबार मैदान 1, गुरुवार पेठ 2, माचीपेठ 1, रामाचा गोट 2, आदिशक्ती आर्केड 2, म्हसवे 1, नागठाणे 1, शाहुपुरी 4, राधिका रोड 2, कठापुर 1, वडुथ 1, पाटखळ 1, शेंद्रेफाटा 1, अतीत 1, भगतगाव 1, काशिळ 1, चिंचणेर निंब 1, सासपडे 3, अपशिंगे 1, पुसेवाडी 1, बोरगांव 1, समर्थनगर 1, अपशिंगे 1.
*जावली तालुका 24 बाधित :* मेढा 2, कुडाळ 8, कुसुंबी 1, गणेशवाडी 1, कुडाळ 2, रेटकवली 5, बिभवी 4, कुसुंबी 1.
*वाई तालुका 39 बाधित :* वाई 2, शेंदुरजणे 5, धोम 7, पंधारेचीवाडी 1, खालची बेलमाची 1, बावधन ओढा 1, रविवार पेठ 3, सोनगिरवाडी 5, बावधन 4, वेलंग 3, धर्मपुरी 2, चिंधवली 2, कठवे 1, दत्तनगर 1.
*पाटण तालुका 15 बाधित :* विहे 1, दौलतनगर 2, ढेबेवाडी 2, मारुल हवेली 5, हरपळवाडी 1, चोपदार वाडी 4.
*कोरेगाव तालुका 33 बाधित :* त्रिपुटी 1, कुमठे 1, कोरेगाव 1, कुमठे 1, देऊर 23, गुजरवाडी 2, कोलवडी 1, आर्वी 1, सर्कलवाडी 1, वाठार किरोली 1.
*फलटण तालुका 37 बाधित :* जाधववाडी 1, मलठण 1, कुंभारगाव 1, मांडव खडक 14, जाधववाडी 8, सोमवार पेठ 3, मलठण 2, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2, राजुरी 3, कमागाव 1.
*महाबळेश्वर तालुका 2 बाधित :* महाबळेश्वर 1, तळदेव 1, *खटाव तालुका 1 बाधित :* खटाव 1.
*माण तालुका 21 बाधित :* पळशी 2, म्हसवड 6, दहिवडी 7, शिंगणापूर 1, खंडाळा शिरवळ 1, खंडाळा 1,लोणंद 2, हिराळी 1,
इतर 2 पोलीस क्वार्टर, ग्रँट रोड मुंबई 1, नानके 1, वाजवालके 1, मुंबई 1,
*218 जणांचे नमुने तपासणीला*
यामध्ये सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, उपजिल्हा रुग्णालय फलटण 108, रायगांव 40, पानमळेवाडी 33, मायणी 16, महाबळेश्वर 11 असे एकूण 218 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 40043
एकूण बाधित 10157
एकूण कोरोनामुक्त 5675
मृत्यू 306
उपचारार्थ रुग्ण 4144
रविवारी
एकूण बाधित 443
एकूण कोरोनामुक्त 157
एकूण बळी 10









