गटप्रवर्तकांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिल्या व्हीसीद्वारे सुचना
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिह्यात वाढत चाललेला कोरोना बाधितांचा आणि मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ट्रेसिंग, टेस्ट आणि ट्रीटमेंट या ट्रीपल टीच्या उपक्रम जिह्यात राबवण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या आदेशानुसार जिह्यातील सर्वच 1496 गावांमध्ये मोहिम राबवण्यास प्रारंभ झालेला आहे. तसेच बुधवारीच जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी गटप्रवर्तकांशी चर्चा करुन व्हीसीद्वारे सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिह्यात आणखी वेगाने ट्रीपल टीचे काम सुरु झाले आहे.
दिवसेदिवस वाढत चालेला कोरोना बाधितांचा आकडा पहाता तो नियंत्रणात आणण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जे जिह्यात इतर आजाराने त्रस्त आहेत तसेच ज्यांना त्रास वाटतो आहे अशांचा शोध घेवून त्यांची कोराना तपासणी करुन त्यांच्यावर लगेच उपचार करण्यासाठी व त्यातून बरे करण्यासाठी ट्रीपल टी हा उपक्रम जिह्यात सुरु करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्याकरता कमिटी गठीत करण्यात आली आहे. त्या कमिटीमध्ये नेमून दिलेल्या जबाबदारीनुसार कामाला प्रारंभ झाला असून जिह्यातील प्रत्येक गावागावामध्ये असलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना टेस्ट केली जावू लागली आहे. जिह्यातील 1496 गावांमध्ये कोरोना तपासणीचे कॅम्प घेतले जात आहेत. जे संशयास्पद वाटत आहेत, त्यांच्या घरी जावून कोरोनाची तपासणी केली जात आहे. त्यांची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे जिह्यात ट्रीपल टीच्या कामाला वेग घेतला आहे.
व्हीसीद्वारे दिल्या सुचना
गटप्रवर्तकांच्यासोबत मी बुधवारी ऑनलाईन व्हीसी घेतली होती. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिह्यात काम सुरु झाले आहे. दररोज माहिती घेतली जात आहे. काम चांगल्या प्रकारे सुरु आहे. – उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे









