प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ घेता येत आहे. या योजनेतर्गंत 2 हजार 455 कोरोना रूग्णांना फायदा मिळाला आहे. सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी योजनेला 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना लागू करण्यात आली आहे. पण, कोरोनाच्या संकटात सर्वांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेची व्याप्ती वाढली असून राज्यातील प्रत्येकाला या योजनेचा लाभ घेता येईल. दरम्यान, 1 एप्रिल 2020 पासून राज्यात ही योजना राबवली जात आहे. या योजनेतर्गंत सातारा जिह्यातील कोरोना रूग्णांना यांचा लाभ मिळाला आहे. यामध्ये जिल्हा शासकीय रूग्णालयासह खाजगी रूग्णालयांचा समावेश आहे.
जिल्हा रूग्णालयात 245 रूग्णांना, मंगलमूर्ती हॉस्पिटल मधील 53 रूग्णांना, सह्याद्री हॉस्पिटल 277, कृष्णा हॉस्पिटल 1 हजार 217, सावित्री हॉस्पिटल लोणंद 22, घोटवडेकर हॉस्पिटल 187, गिताजंली हॉस्पिटल 210, हेरंब हॉस्पिटल 109, संजीवन हॉस्पिटल 45, मायणी मेडिकल कॉलेज 90, अशा एकून 2 हजार 455 रूग्णांना उपचारादरम्यान फायदा मिळाला आहे. 31 जुलैपर्यंत राज्यातील सर्व नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी योजनेला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









