● कृष्णातून 5, पार्ले 3, खावली 5 तर रायगावमधून 6 झाले मुक्त,
● 8 जण पॉझेटिव्ह
● महिला पोलीस अधिकारीही झाली मुक्त
● दिवसभरात 268 निगेटिव्ह
सातारा/प्रतिनिधी
सातारा जिल्हय़ात कोणत्याही प्रकारची उपाय योजना राबवण्यात आलेली नसली तरी कोरोनामुक्तीच्या टक्केवारीत वाढ होत आहे. गुरूवारी 19 जण मुक्त झाले तर दोन दिवसांच्या अहवालांत 8 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दिवसभरात 268 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाच्या युद्धात सातत्याने काही तरी वरखाली होत आहे. त्यात बुधवार-गुरूवारचे दिवस हे आनंदाच्या दृष्टीकोनातून थोडे आनंददायी ठरले. गुरूवारी सकाळी आलेल्या अहवालांत 7 जण पॉझेटिव्ह होते
त्यात
कराडमध्यल्या
खराडे युवक (15),
शिंदेवाडी-विंग युवक (15),
शेणोली युवती (14).
वाई तालुक्यातील
डुईचीवाडी युवती (14)
सातारा तालुक्यातील
कुस बुद्रूक युवक (16)
कारंडवाडी-देगावरोड महिला (65).
खटाव मधील
निढळ महिला (26)
यांचे अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. तर, हडपसर-पुण्याहून आलेल्या 27 वर्षीय युवकाच्या पार्थिवाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
तर, गुरूवारी खटाव तालुक्यातील वडगाव येथील 75 वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे.
कोरोनामुक्तीत होतेय वाढ
सातारा जिल्हय़ातील कोरोनाबाधितांमधून मुक्त होणाऱयांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणांत वाढ होत आहे. जिल्हय़ाची टक्केवारी 43 तर कराडची टक्केवारी 75 पर्यंत पोहोचली आहे.
गुरूवारी कराडच्या कृष्णामधून 5, कराड तालुक्यातील पार्ले येथील सेंटरमधून 3, सातारा तालुक्यातील खावली सेंटरमधून 5 तसेच सातारा तालुक्यातील सेंटर मधून 6 अशा एकुण 19 जणांना कोरोनामुक्त म्हणून जाहिर करताना त्यांना घरी सोडण्यात आले.
महिला पोलीस अधिकारी झाली मुक्त
मुंबई येथे पोलीस दलात अधिकारी असणारी उंब्रजची महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला होता. यामुळे साताऱ्यासह मुंबईत खळबळ होती मात्र याच महिलेने कोरोनामुक्त होत सारी चर्चा संपवली आहे.
जिल्ह्यात 268 निगेटिव्ह आले अहवाल
गुरूवारी आलेल्या अहवालांत वडगावच्या वृद्धाचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे तर 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सकाळी आलेल्या अहवालांत 237 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
भिती संपत चालली आहे की काय ?
गेल्या अडिच महिन्यांपासून असलेली भिती बुधवारच्या ‘निसर्ग’ वादळाच्या भितीनंतर कमी होत आहे की संपत चालली आहे कि काय? असा प्रश्न प्रशासनालाही पडला आहे. गुरूवारी कोणत्याही भितीशिवाय जिल्हय़ातील सर्व शहरे व गावांती मार्केट नेहमीप्रमाणे सुरू होती. दुपारी जिल्हय़ातील बहुतेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र कोरोनाच्या भितीसह पावसाला मागे सारून मार्केटमधील गर्दी काही केल्या हटत नव्हती. पावसाळय़ाच्या तोंडावर पुढील तिन महिन्यांच्या खरेदीसाठी सामान्य लोक बाहेर पडले होतेच तर शेतकरी वर्गही मोठय़ा प्रमाणांत खरेदीत गुंतल्याचे दिसून आले.
जिल्हय़ात गुरूवारपर्यंत
एकुण कोरोनाबाधित 579
एकुण कोरोनामुक्त 254
बळी 24
जिल्हय़ात ऍक्टिव्ह रूग्ण —
गुरूवारी
एकुण कोरोनाबाधित 08
एकुण कोरोनामुक्त 19
बळी 00
दिवसभरांतले निगेटिव्ह 268









