प्रतिनिधी / सातारा
परदेशातून देशात येत असलेले काहीजण नव्या कोरोना स्ट्रेनचे बाधित सापडत असले तरी देशभरातील कोरोना स्थिती आटोक्यात येवू लागलीय. त्यामुळे नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती पार निघून गेली असून जिल्हय़ात देखील बाधित वाढ 50 च्या घरात आलीय. मात्र, गेले दोन दिवस कमी संख्येने कोरोनामुक्तीचे आकडे येत असून रविवारी तर एक देखील रुग्ण कोरोनामुक्त झालेला नाही. त्यामुळे कोरोनामुक्तीचा वेगही मंदावला असून एकही रुग्ण कोरणामुक्त कसा काय झाला नाही ? असा सवाल नागरिकांना पडला आहे
दरम्यान, सायंकाळी येणाऱ्या अहवालात गेल्या सहा महिन्यात पहिल्यांदाच एक देखील रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद नाही. तर गेल्या 24 तासात एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. जिह्यात विविध रुग्णालयातील 15 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. रात्री उशिरा आलेल्या अहवालात 54 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
प्रत्यक्ष उपचारार्थ फक्त 405 रुग्ण
बाधित वाढ मंदावली, मृत्यूदर घटला आणि कोरोनामुक्तीही मंदावल्याचे चित्र जिल्हय़ात असले तरी 1,213 एवढे रुग्ण उपचार्थ आहेत. मात्र, त्यापैकी प्रत्यक्ष उपचारार्थ 405 असून कोरोना केअर सेंटरमध्ये फक्त 55 रुग्ण आहेत. उर्वरित संख्येत बाहेरील जिल्हय़ात असलेली सातारावासियांची संख्या सोडता 600 ते 700 होम आयसोलेट असल्याचे चित्र आहे. जिल्हय़ात एकूण 6,008 बेडपैकी 5,548 बेड रिक्त असून सध्या तरी जिल्हय़ात परदेशातून प्रवास करुन कोणीही नागरिक नसल्याची आरोग्य विभागाची माहिती आहे.
सातारा, माण सोडता सर्व तालुके सावरले
शनिवारी रात्री आलेल्या अहवालात माण 19 व सातारा तालुका 16 बाधित ही अल्पवाढीतील मोठी संख्या सोडली तर जिल्हय़ातील इतर सर्वच तालुक्यात बाधित वाढ एकी संख्येवर आलीय. काही तालुक्यात तर फक्त 1 च्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. तर महाबळेश्वर तालुक्याने कोरोनामुक्ती वाटचाल सुरु केलीय. हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुकाही सावरला असून तिथेही मंदावलेली बाधित वाढ प्रचंड दिलासादायक आहे.
15 जणांचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 7, पिंपोडा येथील 8 असे एकूण 15 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
आज रविवारची स्थिती
एकूण बेड ………..6,008
एकूण उपचारार्थ … 1,213
दाखल रुग्ण ………..405
इतर व आयसोलेट ..700
रिक्त बेड………….5,548
कोरोना केअर सेंटर
(क्षमता 3,295 पैकी दाखल 55)
रिक्त बेड 3,240
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर डीसीएचसी
आणि
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल डीसीएच
(2,713 क्षमतेपैकी दाखल 405)
रिक्त बेड 2,308
दवाखान्यात दाखल 405 पैकी
ऑक्सिजनशिवाय : 91 (क्षमता 707) रिक्त 669
ऑक्सिजनसह : 217 (क्षमता 1,555) रिक्त 1,338
आयसीयू : 97 (क्षमता 451) रिक्त 354
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 2,81,687
एकूण बाधित 54,595
एकूण कोरोनामुक्त 51,533
मृत्यू 1,795
उपचारार्थ रुग्ण 1,267
रविवारी
एकूण बाधित 54
एकूण मुक्त 00
एकूण बळी 00









