प्रतिनिधी / नागठाणे
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुशिक्षित व कुशल बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध माध्यमातून संधी उपलब्ध आहेत.सातारा जिल्हा ही माझी कर्मभूमी असल्याने जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी यशस्वी प्रयत्न करणार असे प्रतिपादन राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रशासकीय संचालक विजयराजे ढमाळ यांनी केले. ते सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या घरी आयोजित बैठकीत बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की आपण अनेक युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. खंडाळा तालुक्याचे औद्योगिकिकरण झाले असल्याने अनेक युवकांच्या हाताला काम मिळाले आहे.संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक रोजगार निर्मिती हे उद्दिष्ट्य आहे.कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार हातचे गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे.मात्र त्याहूनही जास्त रोजगार वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध झाले आहेत.आज व्हेंटिलेटर,ऑक्सिजन याला मोठी मागणी आहे.जिल्ह्यात हा व्यवसाय उभारणीसाठी नवउद्योजक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी या क्षेत्राकडे धाव घेतली पाहिजे.ज्या गोष्टींचा अधिक वापर होतो त्या कालांतराने नादुरुस्तही होतात.त्यामुळे युवकांनी व्हेंटिलेटर,ऑक्सिजन यंत्रणा दुरुस्तीचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करावा असे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रारंभी शाल,श्रीफळ व सातारा कंदी पेढे देऊन गायकवाड कुटुंबीयांतर्फे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी विजयराजे ढमाळ यांचा सत्कार केला. यावेळी जेष्ठ नागरिक मधुकर गायकवाड,राहुल पवार,सनी भिसे,जियांश गायकवाड व नागरिक उपस्थित होते.
Previous Articleकोल्हापूर : स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे त्यासाठी सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा – माजी आमदार अमल महाडिक
Next Article पार्वतीनगर येथे तिघा मटकाबुकींना अटक









