प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 260 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 681 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 1, कराड तालुक्यातील 33, खंडाळा तालुक्यातील 29, खटाव तालुक्यातील 16, कोरेगाव तालुक्यातील 34,महाबळेश्वर तालुक्यातील 10, पाटण तालुक्यातील 13, फलटण तालुक्यातील 27, सातारा तालुक्यातील 83, वाई तालुक्यातील 14 असे एकूण 260 नागरिकांचा समावेश आहे.
681 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 19, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 91, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, कोरेगाव 14, वाई येथील 50, खंडाळा येथील 46, रायगाव 58, मायणी येथील 78, महाबळेश्वर येथील 50, पानमळेवाडी 63, पाटण येथील 8, दहिवडी 26, खावली येथील 48 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 97 असे एकूण 681 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
Previous Articleसातारा : गणेशोत्सवात नियमांचे पालन करा – शाहुपुरी पोलीस
Next Article कर्नाटकला स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये १० पुरस्कार









