सातारा : जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून, आज शुक्रवार (दि. 8) क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठ ता. पाटण या तीन ठिकाणी कोविड लसीकरणाबाबतचा ड्राय रन होणार आहे. तिन्ही ठिकाणी ड्राय रन करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.










