पसरणी, मांढरदेव घाटात दरडी कोसळल्या, 70 बकऱ्यांचा बकऱ्यांचा मृत्यूलाखो रुपयांची हानी, साताऱ्यात मंगळवार तळय़ातले मासे मेले, ज्वारीची पिके भुईसपाट, महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरीला पावसाने दिला झाशा, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचीही दैना
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजता सुरु झालेला पाऊस गुरुवारी 3पहाटेपर्यंत कोसळत होता. पावसाबरोबरच थंडीचा कडाका होता. या अवकाळीच्या कडाक्या पावसामुळे जिह्यातील शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्वारीची अख्खी शेतंच भुईसपाट झाली आहेत. पसरणी, मांढरदेव घाटात सकाळी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले होते. तसेच या पावसामुळे जिल्ह्यात 70 बकऱयांचा मृत्यू थंडीने गारठून झाला आहे. साताऱयातल्या ऐतिहासिक अशा मंगळवार तळय़ातील माशांचा अचानक झालेल्या पावसामुळे ऑक्सिजन कमी झाल्याने मृत्यू झाला. अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अवकाळी पावसाने जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून सुरुवात केली दुपारी काहीसा उघडला होता. पुन्हा सायंकाळी सुरुवात केली ते गुरुवारी पहाटेपर्यंत सुरुच होता. धुक्यांबरोबरच थंडी आणि पाऊस ढगांच्या गर्जनेत रात्रभर सुरु होता, विजांचा लखलखाट सुरु होता. या पावसाने जिह्यातील खरीप हंगामातील ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतांना तळयाचे स्वरुप आले होते. बागायती शेतीबरोबरच जिरायती शेतीचेही नुकसान झाले आहे. त्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱयांनी तरीही आपली स्ट्रॉबेरीचा तोडा सुरुच ठेवला होता. काहीतरी हाताशी लागेल या आशेने हा तोडा सुरु ठेवला होता.
पसरणी आणि मांढरदेव घाटात दरडी कोसळल्या
वाई तालुक्यातील मांढरदेव आणि वाई ते महाबळेश्वर या रस्त्यावर पसरणी घाटात गुरुवारी सकाळी दरडी कोसळल्याचे प्रकार घडले. यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. प्रशासनाने लगेच दरडी हटवण्याचे काम हाती घेतले अन् दुपारपर्यंत वाहतूक सुरु करण्यात आली असली तरीही मंद गतीने ही वाहतूक सुरु होती.
शेळ्य़ा व मेंढरांचा गारठून मृत्यू
झालेल्या पावसाने सातारा जिल्ह्यात शेळय़ा व बकऱयांचा गारठून मृत्यू झाला. त्यामध्ये खटाव तालुक्यातील मेलदरवाडीतील कुमार मदने यांच्या 15 शेळय़ांचा मृत्यू झाला. तर वाई तालुक्यातील देगाव येथील भिरडाचीवाडी येथील शिवाजी शंकर धायगुडे यांच्या 20 मेंढरांचा मृत्यू झाला आहे. तर खटाव तालुक्यातील हुसेनपुर येथील रामचंद्र चव्हाण यांच्या 40 बकऱयांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवार तळ्य़ातील मासे झाले मृत्यू
सातारा शहरातील ऐतिहासिक अशा मंगळवार तळयातील माशांना अचानक वाढलेल्या थंडीमुळे आणि सुरु असलेल्या पावसामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मासे मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार सातारकरांनी गुरुवारी सकाळी पाहिला. पालिकेने लगेच मृतबाहेर बाहेर काढून कृत्रिम पद्धतीने ऑक्सिजन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती सातारा पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
सलग दहा तास
सातारा जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी तालुकानिहाय सातारा 40.1 मिलीमीटर, जावली 5.8 मिलीमीटर, पाटण 31.9 मिलीमीटर, कराड 29.1 मिलीमीटर, कोरेगाव 24.2 मिलीमीटर, खटाव 24.8 मिलीमीटर, माण 32.8 मिलीमटर, फलटण 25.6 मिलीमीटर, खंडाळा 27.1 मिलीमीटर, वाई 30.8 मिलीमीटर, महाबळेश्वर 37.7 मिलीमीटर असा जिल्ह्यात 30.5 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.