सातारा / प्रतिनिधी
जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 279 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 9 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी दिली.
तर क्रांतीसिंह नाना पाटील येथे नरवणे ता. माण येथील 52 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी ता. पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, मुंबई येथून प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे आलेला व तिथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सदंर्भीत केलेल्या 38 वर्षीय पुरुष, अशा 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये सह्याद्रीनगर वाई येथील 50 वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील 75 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये बुधवार पेठ कराड येथील 69 वर्षीय पुरुष व काळगाव (ता. पाटण) येथील 85 वर्षीय पुरुष व गोटे (ता. कराड) येथील 70 वर्षीय पुरुष या 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी कळविले आहे.








