सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातीत हॉटेल, रेस्टॉरंट व ढाबे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार रात्रीच्या 11 वाजल्यानंतर चालू ठेवण्यास सक्त मनाईचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशामधून राष्ट्रीय महामार्गावर असणारे हॉटेल, रेस्टॉरंट ढाबे यांना वगळण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित हॉटेल, रेस्टॉरंट ढाबे इ. 7 दिवस बंद करुन त्यांच्याविरोधात दंडात्मक तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.