अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 24 जुलै 21, दुपारी 3.00
●”तरुण भारत”वर शुभेच्छांचा वर्षाव ●अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्याच्या सर्व दिवशी 9 ते 4 या वेळेत सुरू राहणार ●हॉटेल्स, रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेने सुरू ●खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू
प्रतिनिधी / सातारा :
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी दुपारी जिल्हावासियांना सुखद धक्का दिला तो म्हणजे जिल्ह्यातील लॉकडाऊन उठवण्याचा. त्यांनी सोमवार दि. 26 जुलैपासून काढलेल्या आदेशामध्ये अत्यावश्यक बाबींची दुकाने, आस्थापना ही सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानी दिली आहे. हॉटेल्स, रेस्टाँरट्स यांना 50 टक्के क्षमतेने सर्वच दिवशी सुरु ठेवण्याची परवानगी दिली गेली आहे. खेळाची मैदाने ही सकाळी 7 ते 9 या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी दिली गेली आहे. या आदेशामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून “तरुण भारत”वर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.
जिल्ह्यातील जनतेला लॉकडाऊन कधी उठेल याची उत्सुकता लागून राहिली होती. तब्बल दोन आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशावर सही केली. आदेश जाहीर करताच जिल्ह्यात आनंदीआनंद झालेला आहे. त्यांनी काढलेल्या आदेशामध्ये जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल.अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल.
अत्यावश्यक नसलेली दुकाने, आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायं. 4 वा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे, नाटयगृहे इ पुर्णपणे बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायं 4 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस् यांना आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी असेल, असे आदेश दिले गेलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून उत्साहाचे वातावरण होत आहे.
“तरुण भारत”वर शुभेच्छांचा वर्षाव
“तरुण भारत”ने सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील खदखद, त्यांचा आवाज सातत्याने मांडला आहे. प्रशासनाने साताऱ्यातील जनतेवर कसा लॉकडाऊन लादला गेला आहे. हे वारंवार दाखवून दिले आहे. दि.19 मे ते 24 जुलै पर्यंत सातत्याने प्रशासनाने केलेल्या चुका दाखवून दिल्या आहेत. आकडे अपलोड घोटाळा, अँटीबॉडीज घोटाळा, प्रशासनाकडून लस न घेतलेल्यांचा लसीचा रिपोर्ट आदी प्रकरणे उघडकीस आणून सर्वसामान्य जनतेचा आवाज मांडला होता. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी आज निर्णय घेवून जिल्हा खुला केला आहे. त्यामुळे “तरुण भारत”चे कौतुक होत आहे.









