अचूक बातमी “तरुण भारत” ची, रविवार, 2 मे, दुपारी 12.00
● मे महिन्याचा आरंभ उच्चांकी वाढीनेच ● शनिवारी अहवालात 2,217 बाधित ● कोरोना बळींचा आकडा 2500 पार ● नेमके कोणत्या तालुक्यात किती ? ● सविस्तर अहवाल काही वेळातच ● बाधित वाढ कशी थांबणार ?
सातारा / प्रतिनिधी :
संपूर्ण एप्रिल महिना जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा अक्षरशः कहर केला. 30 एप्रिल रोजी वर्षातील 2,494 एवढी उच्चांकी बाधित वाढ नोंदवली गेली. 1 मे महाराष्ट्र दिन कोरोनामुळे साजरा होत नसताना त्यादिवशी थोडीशी कमी पण 2,383 उच्चांकी वाढीने मे महिन्याचा आरंभ झाला आहे. दोन मे रोजी देखील शनिवारी रात्री च्या अहवालात 2,217 जणांचा अहवाल बाधित आला असल्याने जिल्ह्यावर चिंतेचे सावट वाढलेले आहे. मृत्युदर ही कमी होत नसल्याने त्यावर कशी मात करायची ? बाधित वाढीचा वेग कसा रोखायचा याचं आव्हान जिल्ह्यासमोर आहे.
जिल्हाभर पॅनिक स्थिती
गतवर्षीच्या सप्टेंबर आक्टोंबर पेक्षाही बाधित वाढीचे उच्चांकी आकडे येऊ लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गत शुक्रवारी 2001 अशी भीतीदायक उच्चांकी बाधित वाढ समोर आली त्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र त्यानंतर थोडासा वेग कमी झाला असताना 29 एप्रिल रोजी 2,256 तर 30 एप्रिल रोजी त्याहीपेक्षा भयंकर आकडा 2,493 समोर आल्याने जिल्ह्यातील वातावरण प्रचंड पॅनिक झालेले आहे.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर साठी धावाधाव
जिल्ह्यात सातारा येथे जिल्हा covid-19 हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलसह खाजगी हॉस्पिटल मध्ये जिल्ह्यात एकूण 68 ठिकाणी कोबड बाधित आवर उपचार सुरू आहेत 2,982 ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत मात्र त्यांची वाढती संख्या यामुळे ते बेड अपुरे पडू लागले आहेत. नेमके बेड मिळू शकतील का याची माहिती लोकांना व्यवस्थित मिळत नाही. सगळ्यांचा ओढा जिल्हा बीड हॉस्पिटल आणि सिव्हिल रुग्णालय कडे असल्याने तिथे कोरोना बाधित रुग्णांच्या रांगा लागण्याची वेळ आलेली आहे.
ज्यांच्यावर वेळ येतेय ते हताश आहेत
जिल्ह्यातील ज्यांचे अहवाल बाधित येत आहेत अशा रुग्णांना लक्षणानुसार हॉस्पिटल किंवा होम आयसोलेट होण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र दुसरीकडे मृत्यू वाढत असल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेकजण रुग्णांना घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा आग्रह धरत आहेत. एकीकडे तपासण्यांचा वेग वाढवला त्यामुळे बाधितांची संख्या वाढली मात्र त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुरेशी ठरत नाही हे वास्तव आज जिल्हा अनुभवतो आहे.
शनिवारी अहवालात 2,217 बाधित
मागील दोन-तीन दिवसातील उच्चांकी आकडेवारी नंतर शनिवारी रात्रीच्या अहवालात 2,217 जणांचा अहवाल बाधित आला आहे. या अहवालानुसार एकूण 6 हजार 809 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2,717 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 34.01 असा आहे.
बाधित वाढ रोखण्याचे आव्हान
जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ चिंताजनक ठरू लागली आहे. मात्र शुक्रवारी उच्चांकी 2,494 आकड्या नंतर शनिवारी 2,383 अशी बाधित वाढ समोर आली. त्यामुळे थोडासा वेग मंदावला असला तरी उच्च अंकी संख्येने येणारी बाधित वाढ रोखण्याचं आव्हान जिल्ह्यापुढे अद्याप कायम आहे. मृत्यू मध्ये नवीन उच्चांक झालेले नाहीत याचा दिलासा घेत वाटचाल सुरू आहे.
बेड, ऑक्सिजन साठी पळापळ सुरुच
जिल्ह्यात एकूण उपचार घेणाऱ्यांची संख्या 18 हजारांच्या पार गेले असून त्यापैकी प्रत्यक्ष दवाखान्यात साडेतीन ते चार हजारांच्या वर रुग्ण उपचार घेत आहेत मात्र दुसरीकडे उच्चांकी बाधीत वाढ होत असल्याने आता जिल्ह्यात बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. बेड आणि ऑक्सिजन साठी बाधित आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची जीवघेणी धावपळ जिल्ह्यात सुरू आहे. प्रशासनाकडून सूचनांचा भडिमार सुरू आहे मात्र आरोग्य विभाग कमी मनुष्यबळाने त्रस्त आहे लसीकरण व रुग्णांवर उपचार अशा दोन्ही पातळीवर आरोग्य विभाग लढत असताना नागरिकांनीदेखील लॉकडाउन मधील नियम पाळून सहकार्य करत हा लढा जिंकण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. एवढेच हातात आहे.
शनिवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 5,46,923, एकूण बाधित 1,05,350, एकूण कोरोनामुक्त 83,819, एकूण बळी 2,530, एकूण उपचारार्थ 17,146
शनिवारी जिल्हय़ात बाधित 2,217, कोरोनामुक्त 1,444, बळी 34









