प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात मोठ्या संख्येने येणारे बाधितांचे आकडे सर्वांची चिंता वाढू लागले आहेत. रविवारी जिल्ह्यातील 36 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून बाधितांची एकूण संख्या अचानकपणे हजाराच्या समीप जाताना 973 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील बाधितांचा आकडा अचानक हजाराच्या समीप पोहोचला असताना फलटण तालुक्यातील बरड मधील दोघांनी आज कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 713 जण मुक्त झाले आहेत तर 42 बळी गेलेले आहेत.
जावळीत एका दिवसात 11 बाधीत
रविवारी सकाळी आलेल्या अहवालात जावली तालुक्यात सर्वाधिक 11 जण बाधित आहेत तर सातारा शहराच्या नजीक क्षेत्रमाहुली तसेच एमआयडीसी परिसरातील चंदननगर कोडोलीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
एकाच दिवसात 36 बाधीत वाढल्याने चिंता
या अहवालानुसार यामध्ये कराड तालुक्यातील खूबी येथील 19 वर्षीय युवक, रेठरे खु येथील 21 वर्षीय महिला, तारुख येथील 60 वर्षीय महिला,
पाटण तालुक्यातील सितापवाडी 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील खांडेवाडी वारुडगड येथील 33 वर्षीय पुरुष,
खटाव तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षीय महिला व 24, 26 वर्षीय पुरुष,
कोरेगाव तालुक्यातील बनवडी 39 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 23 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 28 वर्षीय पुरुष, नागझरी येथील 28 वर्षीय पुरुष
जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 22 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 18 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष,
सातारा तालुक्यातील गोडोली येथील 55 वर्षीय पुरुष, जिहे येथील 50 वर्षीय महिला, चंदननगर कोडोली येथील 39 वर्षीय महिला, धावली येथील 26 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, शिरवळ येथील शहाजी चौक येथील 20 व 42 वर्षीय पुरुष,
वाई सह्याद्रीनगर येथील 30 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. एक रुग्ण हा पुणे येथे स्थायिक असल्याने
त्याची गणना जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत केलेली नाही.बरडच्या दोघांची कोरणावर मात विविध रुग्णालय व कोरोना केंअर सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या 2 नागरिकांना आज 10 दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये फलटण तालुक्यातील बरड 26 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
191जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 191 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
103 जणांचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 31, कोरोना केअर सेंटर शिरवळ येथील 15, रायगाव येथील 16, पानमळेवाडी येथील 16, मायणी येथील 11 महाबळेश्वर येथे 14 एकूण 103 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात लॉकडाऊन आवश्यकची चर्चा
एकीकडे शासनाने अनलॉक ची प्रक्रिया सुरू करताना विविध गोष्टी परवानगी देणे सुरू केले असतानाच दुसरीकडे जिल्ह्यात अचानकपणे मोठ्या संख्येने वाढणारी बाधितांची संख्या काळजी वाढू लागली आहे गेल्या दोन-तीन दिवसात कोरोना मुक्ताचा वेग मंदावला तर मोठ्या संख्येने बाधित वाढले. आता यातून सावरुन जिल्हा कोरोना मुक्त करायचा असेल तर जिल्ह्यात आणखीन लॉकडाऊन करायला हवा अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. नव्याने आलेल्या बाधितांमध्ये बाहेरून आलेल्या बाधितांच्या सहवासात येऊन स्थानिक नागरिक कोरोना बाधित झाले आहेत. भविष्यात कम्युनिटी संसर्गाचा धोका यामुळे वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रविवार पर्यंत जिल्ह्यात
एकूण कोरोना बधित 973
एकूण कोरोना मुक्त 713
एकूण बळी 42
रविवारी
एकूण कोरोना बधित 36
एकूण कोरोना मुक्त 02
एकूण बळी oo