प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हा परिषदेत अर्थ विभागानंतर आता आरोग्य विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून आजारी असलेल्या आरोग्य सेवकाची तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागतले अनेकजण सतत त्यांच्या संपर्कात आल्याची चर्चा दिवसभर सुरू असून ते घरीच उपचार घेत असल्याचे समजते.
सातारा जिल्हा परिषदेत मागच्या काही दिवसांपूर्वी अर्थ विभागातील लिपिक व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाधित झाले होते. बाधित झालेले दोघेही बरे झाले. त्यावेळी लिपिक असलेल्या कर्मचाऱ्याच्या जे सहवासात आले होते. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेतले होते. सुदैवाने कोणी ही बाधित झाले नाही. परंतु पुन्हा जिल्हा परिषदेत कोरोनाने एण्ट्री केली आहे. आरोग्य विभागात आरोग्य सेवक हे मंगळवार पेठ सातारा येथे राहतात. त्यांना त्रास जाणवू लागल्याने दि.12पासून त्यांनी कामावर येणे बंद केले. त्यांनी स्वाब तपासणी केली असता रात्रीच्या अहवालात ते पॉझिटिव्ह आले. याची माहिती आरोग्य विभागात कळताच अनेक भयभीत झाले.मात्र, ते दि.12पासून कामावर आले नसल्याने सुटकेचा निश्वास टाकला असला तरीही कोण सहवासात असते त्यांची तपासणी होणार असल्याची चर्चा सुरू होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









