हद्दवाढ अभिनंदन ठराव रंगली शर्यत
उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांच्या नावाचा गजर
प्रतिनिधी / सातारा
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकांनी घरून उपस्थिती लावली. सुरुवातीला शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी दुखवट्याचे ठराव मांडले. अभिनंदन ठराव मांडण्यास सुरुवात सातारा पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर यांनी केली.
या सभेत हद्दवाढ केल्यावरून आणि कोरोना हॉस्पिटल उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि वेदांतिकाराजे यांच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. अर्चना देशमुख यांनी हद्दवाढीमध्ये खासदार उदयनराजे यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांचा अभिनंदन ठराव घेण्यात यावा, खंडाळा सभापतीनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी केली. अशी सातारा शहर हद्दवाढीवरून अभिनंदन ठराव करण्यासाठी चढाओढ सुरू होती.