सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी बीडहून डॉ. राधाकिशन पवार हे सातारा जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बदलून आले आहेत. ते गुरुवारी पदभार स्वीकारतील, असे सांगण्यात येते.









