प्रतिनिधी / नागठाणे
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवसायासाठी निर्बंध घालूनही वेळेनंतर हॉटेल उघडे ठेवून व प्रवाश्यांना जेवण देऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आशियाई महामार्गावरील तीन हॉटेल्सवर बोरगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे कारवाई केली.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी पहाटे १२.१५ च्या सुमारास बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ.सागर वाघ,हवालदार विजय साळुंखे, विशाल जाधव व चालक टीकोळे हे महामार्गावरून बोरगाव ते काशीळ पेट्रोलिंग करत असताना त्यांना माजगाव फाटा,खोडद फाटा व काशीळ येथे जिल्हाधिकाऱ्यानी विहित केलेल्या वेळेनंतरही हॉटेल उघडी असल्याचे आढळले.यावेळी येथे काही लोक जेवण करत असल्याचेही आढळले.तसेच हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टसिंग राखले नसल्याचे व मास्कचा वापर केला नसल्याचेही आढळले.त्यामुळे या हॉटेलमध्ये कोव्हिडं-१९ रोगाचा प्रादुर्भाव होईल असे वर्तन केले.
पोलिसांनी माजगाव फाटा येथील हॉटेल राजमुद्राचा हॉटेलचालक मिनाज कुंजकल चंद्रकुडी,खोडद फाटा येथील हॉटेल नवमी व नवमी बारचा चालक दयानंद जनार्दन शेट्टी व काशीळ येथील हॉटेल वैभवचा चालक कैलास हणमंत शिंदे यांच्याविरुद्ध भा.दं. वि.स कलम १८८,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र कोव्हिडं विनियमन कलम ११ व साथरोग प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल करत आहेत.
Previous Articleमनपाचे 85 पैकी केवळ 20 गाळे भाडेतत्त्वावर
Next Article मनपाने थकविले 86 कोटीचे वीजबिल









