रस्त्यावर विनाकारण ग्रीड टाकल्याने उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक हैराण
सातारा / प्रतिनिधी :
जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हापरिषद मार्गावर गेल्या दोन दिवसांपूर्वी चांगल्या रस्त्यावर बारीक ग्रीड टाकण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर सर्वत्र धूळ पसरली असून, लोकांना श्वास घेणे अवघड झाले आहे. या मार्गावरून येणाऱ्या वाहनांना धुळीमुळे समोरील वाहने ही दिसत नाहीत. शिवाय या धुळीमुळे रस्त्यावर दुचाकी वाहने घसरून अपघातही होत आहेत. चांगल्या रस्त्यावर पुन्हा का ग्रीड टाकण्यात आली, असे प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत तर काहींनी या मार्गावरून जाणे येणेच बंद केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच असा प्रकार होत असेल तर नागरिकांनी तक्रार कोठे करायची असा प्रश्न निर्माण होत आहे. या मार्गावर पाणी मारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.









