प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात कोरोनाची दाहकता वाढत असताना रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे तर कोणाचे रिपोर्ट निगेटिव्ह असताना देखील शासकीय यंत्रणा त्यांना रिपोर्ट पॉझिटिव्ह सांगत असल्याचे प्रकार घडत आहेत. तर गोवे, ता. सातारा येथे होम आयसोलेट असलेल्या व लिंब आरोग्य केंद्राच्या निगराणीखाली असलेल्या एका रुग्णावर कारण नसताना आदेशाचे उल्लंघन केले असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर रविवारी रात्री बाधितांची संख्या कमी आल्याने थोडा दिलासा मिळत असतानाच सोमवारी 25 बाधितांचे मृत्यू झाल्याचा अहवाल चिंतीत करणारा ठरला आहे.
जिल्हा रुग्णालयातून बाधित पळाला
वाई येथे उपचार सुरु असलेल्या कोरोना बाधित रुग्णाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर सोमवारी सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असलेला सांगली जिल्हय़ातील 65 वर्षीय बाधित रुग्णांना धूम ठोकल्याची घटना घडलीय. याबाबत जिल्हा रुग्णालयातील पोलीस कक्षातून सांगली पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून त्या रुग्णाची शोध मोहीम राबवण्याची पाळी यंत्रणेवर आली आहे.
न घाबरण्यासारखी परिस्थिती तयार करा
वाढत्या रुग्ण संख्येने भीतीचे वातावरण तयार होत असतानाच एक रुग्ण पळून जातो, एक रुग्ण आत्महत्या करतो हे सर्व भीतीतून निर्माण होत असलेल्या घटना आहेत. उपचार घेतले तर कोरोना बरा होता हे एकदा आरोग्य विभागाने ठामपणे जाहीर करावे. नागरिकांना न घाबरण्यासारखी स्थिती ज्या ज्या ठिकाणी उपचार सुरु आहेत तिथे निर्माण करा. कारण आरोग्य विभागच आता जनतेचे मायबाप आहेत. या मायबापानेच धीर दिला पाहिजे, उपचार केले पाहिजेत. अन्यथा मायबाप असलेल्या आरोग्य विभागाच्या खांद्यावर विश्वासाने कशी मान टाकायची असे वाटण्यासारखी स्थिती निर्माण करु नका, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 498 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 25 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्हय़ात 25 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय, सातारा भरतगाव 65 वर्षीय पुरुष, कुडाळा ता. जावली 76 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड 60 वर्षीय महिला, वडूज ता. खटाव 65 वर्षीय पुरुष, इस्लामपूर 80 वर्षीय पुरुष, ढोरगल्ली 70 वर्षीय महिला, विद्यानगर कराड 67 वर्षीय पुरुष, पुसेगाव ता. खटाव 43 वर्षीय पुरुष, वेण्णानगर 55 वर्षीय महिला, वाठार किरोली, ता. कोरेगाव 70 वर्षीय महिला, कोंडवे ता. सातारा 40 वर्षीय पुरुष, खावली ता. सातारा 70 वर्षीय महिला. जिह्यातील विविध खासगी रुग्णालयातील भांडवली ता. माण 70 वर्षीय पुरुष, उचिताने ता. खटाव 65 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड 57 वर्षीय महिला, सैदापूर कराड 76 वर्षीय पुरुष, रेठरे ता. कराड 69 वर्षीय महिला, सोमवार पेठ 72 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण 54 वर्षीय पुरुष, करंजे पेठ 58 वर्षीय महिला, एमआयडीसी सातारा 90 वर्षीय महिला, आसरे ता. वाई 78 वर्षीय महिला, कासेगाव 72 वर्षीय महिला, पांडे ता. वाई 65 वर्षीय महिला, मंगळवार पेठ 86 वर्षीय पुरुष असे एकूण 24 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
रविवारी रात्री 498 बाधितांमध्ये :
सातारा तालुका 98 बाधित
सातारा तालुक्यातील सातारा 10, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, रविवार पेठ 2, बुधवार पेठ 1, मंगळवार तळे 1, केसरकर पेठ 2, न्यु विकास नगर 1, दुर्गा पेठ 1, करंजे 3, सदरबझार 3, गोडोली 2, शाहुपूरी 4, शाहुनगर 2, विसावानाका 1, व्यंकटपुरा पेठ 2, मल्हार पेठ 1, संभाजीनगर 2, विकासनगर 1, अजिंक्य कॉलनी 1, रामाचा गोट 1, संगमनगर 2, गडकरआळी 2, कर्मवीरनगर 1, कोडोली 3, निसराळे 1, पाडळी 1, लिंब, गोवे 1, 1, आसनगाव 1, कोंडवे 2,तासगाव 2, अपशिंगे 1, संगम माहुली 2, निनाम पाडळी 1, खावली 1,आटपाडी 1, खिंडवाडी 1, तांदळेनगर 1, जिल्हा रुग्णालय 2, महागाव 1, कृष्णानगर सातारा 1, अंबेदरे 1, गोळीबार मैदान सातारा 2, देगाव फाटा 1, पोलीस मुख्यालय 3, कृपा कॉलनी सातारा 1, सोनगाव 2, सैदापूर सातारा 2, धनगरवाडी 2, वडूथ 3, साबळेवाडी 1, आसरे 3, बारवकरनगर सातारा 1, क्षेत्रमाहुली 1.
वाई तालुका 68 बाधित
वाई 2, रविवार पेठ 3, पाचवड 1, निमकवाडी 1, भुईंज 4, किकली 1, पसरणी 3, सिद्धनाथवाडी 1, मालदपुर 1, शहाबाग 1, वेलंग 1, गंगापुरी वाई 1, गणपती आळी 3, चिखली 2, फुलेनगर वाई 1, यशवंतनगर 3, सोनिगरीवाडी 2, किकली 1, अमृतवाडी 3, जांभ 1, दह्याट 8, एकसर 1, आनंदपूर 8, वाई एमआयडीसी 3, व्याजवाडी 3, भोगाव 1, शेलारवाडी 4, सह्याद्रीनगर वाई 1, धर्मपुरी 2, चिखली 1.
खंडाळा तालुका 78 बाधित
खंडाळा 5, लोणंद 11, शिरवळ 6, पळशी 4, चावडी चौक शिरवळ 2, बावडा 2, अंधोरी 3, कोपर्डे 12, लोणी 1, विंग 4, शिंदेवाडी 1, लिंबाचीवाडी 1, जवळे 1, ढोबरे माळा 1, जांभळीचा मळा 7, अहिरे 3, उंबरीवाडी 14,
कोरेगाव तालुका 67 बाधित
तालुक्यातील कोरेगाव 13, कटापूर 1, रहिमतपूर 3, कुमठे 1, शिंरबे 1, अंभेरी 1, तारगाव 3, वाठार किरोली 12, चिंचळी 2, सातारा रोड 8, बिचुकले 1, सुलतानवाडी 1, पिंपोडे बु 4, वाघोली 2, वाटार स्टेशन 1, आसरे 2, विठ्ठलवाडी 2, भाकरवाडी 2, धुमाळवाडी 4, बर्गेवाडी 2, किन्हई 1.
कराड तालुका 37 बाधित
कराड 9, सोमवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, आगाशिवनगर 2, मलकापूर 1, सैदापूर 1, काले 1, आरेवाडी 1, विजय नगर 2, नारयणवाडी 1, कोर्टी 1, मार्केट यार्ड कराड 1, कार्वेनाका 1, अंबवडे 1, विरवाडे 1, शिरवडे 2, निगडी 1, बनवडी 6.
फलटण 36 तालुक्यातील
स्वामी विवेकानंद नगर 1, कोळकी 4, भडकमकरनगर 2, वाठार निंबाळकर 3, तरडगाव 2, शिंदेमळा तारगाव 2, तामखाडा 5, निरगुडी 1, बरड 2,पिंपळवाडी 1, पिप्रद 3, साखरवाडी 2, खटकेवस्ती 2, पठाणवाडी 1,शिंदेवाडी खुंटे 1, सस्तेवाडी 4
महाबळेश्वर तालुका 36 बाधित
तापोळा 2, गोडोली 19, दांडेघर 2, नाकींदा 4, खांबील चोरगे 9
पाटण तालुका 5 बाधित
अमरगाव 1, रास्ती 1, बोपोली 2, चिखलेवाडी 1.
जावली तालुका 12 बाधित
म्हावशी 2, कुडाळ 1, रागेघर 1, दापवडी 1, मेढा 6, केळघर 1.
माण तालुका 3 बाधित
दहिवडी 1, म्हसवड 1, मार्डी 1.
इतर 9
बाहेरील जिल्ह्यातील : चेंबुर मुंबई 1.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 49,267
एकूण बाधित 18,988
बरे झालेले 10,777
मृत्यू 513
उपचारात 7,698









