वार्ताहर / कास :
परळी खोऱ्याच्या डोंगरमाथ्यावरील जळकेवाडी (खालची) या गावातील एकाच कुटुंबातील 9 जणांसह अन्य तिघांचे असे एकूण 12 रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळकेवाडी येथील एकाच कुटुंबातील चार- पाच जणांना थंडी, ताप आणि कणकणीचा त्रास होऊ लागल्याची माहीती धावली आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका गितांजली नलावडे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी जळकेवाडी येथे सायंकाळी धाव घेऊन गावातील 50 हून अधिक नागरिकांची जागेवरच कोरोना टेस्ट केली. यामधील एकाच कुटुंबातील नऊ जणांसह गावातील अन्य तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या बाधितांना घरातच विलगीकरणात करून त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले आहेत.
धावली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर सोमवारी लसीकरणास प्रारंभ झाला असून, 100 हून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. 45 वयापुढील उर्वरीत नागरिकांचे लसीकरण धावली उपकेंद्रावर सोमवारी होणार आहे.