जगतापवाडी आमराई ते प्यारेन्ट्स स्कूल रस्त्यावर सायंकाळी भरते जत्रा, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील जगतापवाडी शाहूनगर परिसरात रोज सायंकाळी इविनिंग वॉकचा नावाखाली अक्षरशः जत्रा भरत असल्याचे चित्र समोर आले असून लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी घरी बसण्याचे असतानाही शाहूनगर येथील जगतापवाडी आमराई ते प्यारेन्ट्स स्कूल या मार्गावर नागरिक सायंकाळी फिरण्यासाठी गर्दी करत आहेत.
शिवाय या मध्ये वयोवृद्ध नागरिक ही असल्याने विनामास्क फिरणाऱ्या या लोकांच्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, या परिसरात अनेक कॉलोनी आहेत रामराव नगर असे अनेक वस्त्या आहेत आणि या वस्तीतील नागरिक या ठिकाणी शासन आदेश झुगारून फिरायला, वॉक ला येतात, सध्या चालू असलेल्या स्ट्रेनमध्ये असे अनेक नागरिक आहेत जे पोझिटीव्ह आहेत. मात्र त्यांना लक्षणे नाहीत ते फक्त कॅरिअर ची भूमिका बजावत आहेत असे कॅरिअर जर या ठिकाणी फिरत असतील तर इतर फिरणाऱ्या लोकांना त्याचा नक्कीच धोका आहे.
आणि साध्य हॉस्पिटल आणि बेडची स्थिती काही वेगळी सांगायला नको मग अश्या या भयानक परिस्थितीमध्ये शासन नियम मोडून इविनिंगवॉक करणे किती गरजेचे आहे ते आपले आपल्याला समजले पाहिजे प्रशासन आपले काम करत आहेत मात्र नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. हे कळले तर नक्कीच आपण या कोरोना वर मात करू.









