प्रतिनिधी/ सातारा
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचा भंग करत चिकन विक्री करत असल्याचे पालिकेच्या भरारी पथकास आढळून आल्याने पथकाने दोन वेळा दंडात्मक कारवाई केली होती. बुधवारी पोलीस निरीक्षक मांजरे व अतिक्रमण पथकाचे प्रशांत निकम यांच्या संयुक्त पथकाने सातारा एग्ज ऍण्ड चिकन सप्लायर्स दुकान सिल करण्यात आले आहे.








