● एका महिन्यात वाढले तब्बल तीन हजार बाधित
● बळींचा आकडाही झपाटय़ाने वाढतोय
● दिवसात 6 बळी
● 48 जण कोरोना मुक्त
● खासगी हॉस्पिटलमध्ये 33 बाधित
● अनलॉकमुळे बाजारपेठा गजबजल्या
● कराडच्या नगराध्यक्षांनी हरवले कोरोनाला
● कराड पाठोपाठ साताऱ्याचा नंबर
●पर्यटनस्थळी जाणारांवर पोलीस ठेवणार वॉच
● रात्रीच्या अहवालात 169 बाधित
प्रतिनिधी/सातारा
जिल्हा अनलॉक होत असताना कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. एका महिन्यात तब्बल तीन हजार बाधित वाढले असून बळींची संख्या सुद्धा 85 ने वाढली आहे. त्यामुळे यापुढे जिल्हय़ातील नागरिकांना मोकळीक दिली असली तरी कोरोनाला हद्दपार करायचे असल्याने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. जिल्हय़ातील लॉकडाऊन उठवल्याने शनिवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. कोरोना संकटाचे भान राखत मुस्लीम बांधवांनी बकरी ईदचा सण घरीच साजरा केला. टेस्ट वाढवल्यामुळे शुक्रवारी रात्री आलेल्या 228 जणांच्या बाधित अहवालामुळे जिल्हय़ाला हादरा बसला आहे. जिल्हय़ात वेगवेगळय़ा गावात होणाऱ्या कोरोनाच्या साखळय़ा तोडण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडण्याचे या आठवडय़ात प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये ज्येष्ठांपासून तरुणांचाही समावेश आहे. आतापर्यत 134 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या वाढू लागल्याने जिह्यातील सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहे. बेडची संख्या वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न्शील असले तरी बेड अपुरे पडत आहेत. अनलॉक सुरु केल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत होते. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात नव्याने 169 जण बाधित झाले आहेत. रात्री आणि आजच्या कोरोना बाधिताच्या आकडय़ात साताऱयाचा कराड पाठोपाठ नंबर लागला आहे. ऑन फिल्ड असणाऱ्या कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
*कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केली कोरोनावर मात*|
कोरोना हे मानवी संकट जगावर ओढवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत लढणे हेच सूत्र अंगी बाणत जनतेसाठी, रयतेसाठी झगडत होत्या कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे. त्यांना कोरोनाने गाठले. परंतु कोरोनारुपी राक्षसाला त्यांनी हरवून पुन्हा कराडकरांना नव्या उमेदीने अवघी कराडनगरी कोरोनामुक्त करण्याचे ध्येय घेवूनच त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांचे कौतुक होत आहे. उपचार घेत असतानाही त्यांनी कराड शहर कसे कोरोनातून बाहेर काढता येईल याचा आढावा घेत होत्या.
*जिह्यातील 201 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित*
जिह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 201 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर सातारा, कराड, फलटण व वाई तालुक्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
*वाई तालुक्यातील* वाई येथील 53,37,34,48 वर्षीय पुरुष 14 वर्षीय बालक, 45,18,26,70,30,36,46 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालीका, गणपती आळी येथील 57 वर्षीय पुरुष, यशवतंनगर येथील 59 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 34 वर्षीय पुरुष, खानापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पेटकर कॉलनी येथील 54 वर्षीय पुरुष, काझी कॉलनी येथील 22 वर्षीय महिला, सिध्दनाथवाडी येथील 34 वर्षीय महिला, शहाबाग येथील 32,35 वर्षीय पुरुष, जांब येथील 56 वर्षीय पुरुष, सह्याद्रीनगर येथील 33 वर्षीय पुरुष, बावधन येथील 16 वर्षीय युवती, कवठे येथील 59,39,35, वर्षीय महिला 2 वर्षीय बालीका 10 वर्षीय बालक व 38 वर्षीय पुरुष, परखंदी येथील 9 वर्षीय बालक.
*कराड तालुका वाढीत टॉपवर*
कराड तालुक्यातील येवती येथील 62, 53 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवक, शामगाव येथील 33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालीका, कोयना वसाहत येथील 42 वर्षीय महिला,सजूर येथील 60 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 43 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 28 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 37 वर्षीय पुरुष, शेरे येथील 48,70 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 36 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 32 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 14 वर्षीय बालीका, म्हासोली येथील 26 वर्षीय महिला, कालवडे येथील 66 वर्षीय पुरुष 20 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल येथील 51,44 वर्षीय पुरुष, श्रध्दा क्लिनिक येथील 38,62,56 वर्षीय पुरुष 46 वर्षीय महिला, सैदापूर येथील 37 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 24,53,25 वर्षीय पुरष 60,40 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 95 वर्षीय महिला 32 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी येथील 48 वर्षीय पुरुष,
*खंडाळा तालुक्यात वाढले ३४ रुग्ण* खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 60 वर्षीय महिला, तळेकर वस्ती विंग येथील 27,40 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला, शिरवळ येथील 79,24,32,41,31,42, वर्षीय पुरुष व 5,10,13 वर्षीय बालक 8 वर्षीय बालीका 60,50,29,31,60,36,29,28,27,56,34, वर्षीय महिला 5 वर्षीय बालीका, लोणंद येथील 26,66 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुण 26 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी अहिरे येथील 46 वर्षीय पुरुष, शिवाजी चौक खंडाळा येथील 45 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, मोर्वे येथील 32 वर्षीय पुरुष.
*सातारा तालुका पुन्हा वाढतोय*
सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर येथील 24, 45,48 वर्षिय पुरुष व 11 वर्षीय बालक, 42,42,42,20 वर्षीय महिला व 13 वर्षीय बालीका व 18 वर्षीय तरुणी, कण्हेर येथील 27, 29,29 वर्षीय महिला,34,40,41,40 वर्षीय पुरुष व 4 व 7 वर्षीय बालक,शेंद्रे येथील 22 वर्षीय महिला, कुस येथील 65,32 वर्षीय महिला 46 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 30,26 वर्षीय पुरुष 45 वर्षीय महिला, अमर लक्ष्मी सोसायटी संभाजीनगर येथील 63,39,46, वर्षीय पुरुष व 12 वर्षीय बालक 32,71,43 वर्षीय महिला व 14 वर्षीय बालीका, कामाठीपुरा येथील 20 वर्षीय पुरष.
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव येथील 28 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 25,20,40,70,55 वर्षीय महिला 15 वर्षीय बालक व 47 वर्षीय पुरुष, वाघोली येथील 47 वर्षीय पुरुष,
*खटाव तालुक्यातील* थोरवेवाडी येथील 20 वर्षीय तरुणी, चितळी येथील 25 वर्षीय महिला, उंबार्डे येथील 70 वर्षीय पुरुष,
*फलटण तालुक्यात १७ रुग्ण*
फलटण तालुक्यातील मलठण येथील 44 वर्षीय पुरुष, 40,60 वर्षीय महिला, मुंजवडी येथील 30,65 वर्षीय पुरुष, जिंती नाका येथील 59,20 वर्षीय पुरुष 12 वर्षीय बालक 17,16 वर्षीय युवती 35 वर्षीय महिला, रामबाग कॉलनी येथील 62,38 वर्षीय महिला 38 वर्षीय पुरुष 10 वर्षीय बालक, स्वामी विवेकानंद नगर येथील 64 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील 52 वर्षीय पुरुष,
*महाबळेश्वर तालुक्यात ९ रुग्ण*
महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 14 वर्षीय तरुण, 36, 65,48,22 वर्षीय महिला, 25,24 वर्षीय पुरुष, बेल एयर पाचगणी येथील 31 वर्षीय महिला, पाचगणी येथील 27 वर्षीय महिला,
*दुदुस्करवाडीत रुग्ण वाढेताहेत*
जावली तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 69,32,45,35,60,18,72,49,72,36 वर्षीय पुरुष व 14,14,58,38,23,40,22,29,20,52,72 वर्षीय महिला 17 वर्षीय बालक,
*पाटण तालुक्यात 8 बाधित*
पाटण तालुकयातील सनबुर येथील 38 वर्षीय पुरुष, पाटण येथील 28 वर्षीय महिला 55 वर्षीय पुरुष, तारळे येथील 4 वर्षीय बालक 60 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 41 वर्षीय पुरुष, निसारी येथील 58,80 वर्षीय पुरुष,
*4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय सातारा येथे येवती ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष व झिरपवाडी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सातारा येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये गुरुवार पेठ येथील 25 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा व वाई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये सोनगीरवाडी ता. वाई येथील 35 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
*48 नागरिकांना दिला डिस्चार्ज*
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 48 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये
*महाबळेश्वर तालुक्यातील* गोडवली येथील 40 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला,
खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष,
*सातारा तालुक्यातील* जिहे येथील 70 वर्षीय महिला, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 39,48,41 वर्षीय महिला 42 वर्षीय पुरुष, वेंकटपुरा पेठ येथील 64 वर्षीय महिला, कारंडी येथील 65 वर्षीय महिला, देगाव फाटा येथील 34 वर्षीय महिला, गजेगाव येथील 25 वर्षीय महिला, कण्हेर येथील 65 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, तामजाई नगर येथील 5 वर्षीय बालीका, सदरबझार येथील 21,27,30,25 वर्षीय पुरुष व 40,43 वर्षीय महिला, नवीन एमआयडीसी येथील 2 वर्षीय बालीका, शिवनगर एमआयडीसी येथील 58,30, 28,45 वर्षीय पुरुष 13 वर्षीय बालक व 25,55 वर्षीय महिला, करंजे येथील 34 वर्षीय पुरुष,
*कोरेगांव तालुक्यातील* कालवडी येथील 55 वर्षीय महिला,
*कराड तालुक्यातील* वान्याचीवाडी येथील 62 वर्षीय महिला, मिरगाव येथील 31 वर्षीय महलिा, मलकापूर येथील 32,24 वर्षीय पुरुष, किवळ येथील 69 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27 वर्षीय डॉक्टर 31 वर्षीय महिला, टेंभू येथील 40 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 61 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 31 वर्षीय महिला,
*पाटण तालुक्यातील* महिंद येथील 58 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय पुरुष, कालगांव येथील 20 वर्षीय तरुणी, खाले येथील 31 वर्षीय पुरुष, तारळे येथील 22 वर्षीय तरुण,
*वाई तालुक्यातील* दत्त नगर येथील 32 वर्षीय पुरुष, शेंदुर्जणे येथील 40 वर्षीय पुरुष.
*559 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 28, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 41, कोरेगांव येथील 22, वाई येथील 22, खंडाळा येथील 95, रायगाव 30, पानमळेवाडी 96, मायणी 58, व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 86 असे एकूण 559 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले.
*खासगी प्रयोगशाळेतील अहवालात 33 रुग्ण बाधित*
सातारा जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या 33 रुग्णांचे ( यामध्ये शिरवळ येथील 21, खंडाळा येथील 2, सातारा येथील व्यंकटपुरा 1, निगडी 1, ग्रीनसीटी भूविकास बँक 1, अंगापूर 1, त्रिमर्ती मंगल कार्यालय 1, कारी 1, दंगाव शिरगाव 1 ( सकाळी 1 मृत व्यक्तीचा व आत्ताच्या 2 मृत व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे ) खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोविड बाधित असल्याचे कळविले आहे. यामध्ये सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये परखंदी, ता. वाई येथील 81 वर्षीय महिला व गोडोली ता. सातारा येथील 64 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपाचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
*जिल्हय़ात शनिवारी*
एकुण बाधित 202
एकुण मृत्यू 06
एकुण मुक्त 48
*जिल्हय़ात शनिवारपर्यंत*
बाधित 4252
मुक्त 2084
मृत्यू 136
उपचारार्थ 2032
Previous Articleबहिण भावाची वीण घट्ट करणार फक्त एक व्हॉटस अॅप नंबर
Next Article कोल्हापूर : पावसाअभावी पेरणी पिके करपली








