प्रतिनिधी-नागठाणे:
नागठाणे(ता.सातारा) येथील घाडगे हॉस्पिटलमध्ये नुकतीच एक अवघड लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ.विकास घाडगे व त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली.त्यामुळे नागठाणेसारख्या ग्रामीण भागातही आता रुग्णांना अवघड शस्त्रक्रिया होऊ लागल्याने येथील रुग्णांना आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
करंजे (सातारा) येथील ४५ वर्षांच्या श्रीमती लोबडे यांच्या उजव्या बाजूला बीजांडाला मोठी गाठ होती.त्यामुळे रुग्णाला सतत पोटात अस्वस्थ वाटत होते.तसेच त्यांचे पोटही फुगले होते.ही गाठ हातालाही जाणवत होती.शस्त्रक्रियेशिवाय ही गाठ काढणे अशक्य होते.व त्यासाठी पोटाची चिरफाडही करावी लागणार होती.
डॉ.विकास घाडगे यांनी त्यांच्या सर्व तपासण्या केल्यानंतर लेप्रोस्कोपीकद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.ही शस्त्रक्रिया अवघड होती.यावेळी लेप्रोस्कोपीक दुर्बीणीद्वारे ही गाठ यशस्वीपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आले.या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या पोटाची चिरफाड वाचली व कमी रक्तस्त्राव झाल्याने रुग्णाला त्रासही झाला नाही.दुसऱ्या दिवसापासून रुग्ण जेवण घेऊ लागला.तर तिसऱ्या दिवशी त्याला घरी सोडण्यात आले.रुग्णाला कमी त्रास झाल्याने नातेवाईकही आनंदित झाले.
ही अवघड शस्त्रक्रिया डॉ.विकास घाडगे यांनी केली. त्यांना भुलतज्ञ डॉ.निलेश भुते,ओ. टी.असिस्टंट निलेश घाडगे यांनी सहकार्य केले.नागठाणेसारख्या ग्रामीण भागात घाडगे हॉस्पिटलच्या माध्यमातुन डॉ.विकास घाडगे यांनी लेप्रोस्कोपीक शस्त्रक्रियेचे दालन उघडे केले असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची सोय झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









