प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील ग्रेड सेपरेटरमध्ये स्टंट करून त्याचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या संबधित आदेश सहपोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी देताच त्या युवकावर गुन्हा दाखल झाला असून ऋतुराज राजेंद्र करंजे (वय 27 रा. दौलतनगर) असे त्याचे नाव आहे. स्टंटबाजावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे एपीआय विठ्ठल शेलार यांनी सांगितले.









