सोमवारपर्यंत सातारा तालुक्यात 144 अर्ज दाखल
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याऱ्यांनी वेग घेतला आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत 878 ग्रामपंचायतीसाठी 2 हजार 308 जणांनी अर्ज दाखल केले. तर मंगळवारी दाखल झालेल्या अर्जाची संख्या रात्री उशीरापर्यंत समोर आली नव्हती. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या इच्छूक व कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत होता.
सातारा जिल्ह्यात 878 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी रात्री उशीरापर्यंत 2 हजार 308 जणांनी अर्ज दाखल केले. सातारा तालुक्यातील 130 ग्रामपंचायतीसाठी 144 जणांनी अर्ज दाखल केले. कराड तालुक्यातील 104 ग्रामपंचायतीसाठी 810 जणांनी अर्ज केले. पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीसाठी 212,कोरेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीसाठी 232 अर्ज,वाई तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीसाठी 130, खंडाळा तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीसाठी 137 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
महाबळेश्वर तालुक्यातील 42 ग्रामपंचायतीसाठी 53 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीसाठी 175 जणांनी, जावली तालुक्यातील 75 ग्रामपंचायतीसाठी 126, माण तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींसाठी 69 जणांनी अर्ज दाखल केले. खटाव तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीसाठी 220 जणांनी अर्ज दाखल केले. जिह्यातील सातारा तालुक्यात काल रात्रीपर्यंत 144 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
सातारा तालुक्यात मंगळवारीही अर्ज भरण्यासाठी इच्छूकांची झुंबड उडाली होती. काल रात्री उशीरापर्यंत सासपडे 11, वळसे 4, संगममाहुली 1, गजवडी 7, पिलाणी2, फत्यापूर 9, फडतरवाडी 3, वर्ये 8, पाडळी 10, अतित 1, समर्थनगर 4, कुसवडे 1, अंगापूर वंदन 1, तासगाव 2, कोंडवे 3, आंबळे रायघर 3, ठोसेघर 3, जांभे 2, आंबवडे बुद्रुक 1, मस्करवाडी 3, कोडोली 6, धनगरवाडी 1, पिलाणीवाडी 1, शिवाजीनगर 1, राकुसलेवाडी 1, धनावडेवाडी 5, किडगाव 7, इंगळेवाडी 5, आंगुडेवाडी 3, देवकल पारंबे 2, सैदापूर 10, चाळकेवाडी 1, काळोशी 1, कुस खुर्द 5, कुरुलबाजी 4, अंगापूर तर्फ 1 असे एकूण 143 अर्ज दि. 28 रोजी उशीरापर्यंत दाखल झाले होते.
वाई तालुक्यात सोमवारी रात्रीपर्यंत 118 अर्ज दाखल
वाई तालुक्यात काल रात्री उशीरापर्यंत 118 अर्ज दाखल झाले होते. मंगळवारीही गर्दी दिसत होती. कालपर्यंत दाखल झालेल्यांमध्ये बावधन 5, पांढरेचीवाडी 1, अनपटवाडी 6, कणूर 5, दरेवाडी 7, सुलतानपूर 2, लोहारे 6, वासोळे 4, सुरुर 1, नांदगणे 3, बेलमाची 1, व्याहळी पूर्नसन 1, अनवडी 3, चोराचीवाडी 3, चांदक 2, रेणावळे 1, खावली 4, पसरणी 1, मांढरदेव 5, गुंडेवाडी 5, धावडी 4, वरखडवाडी 1, चिखली 5, खोलवडी 1, राऊतवाडी 1, शेंदूरजणे 3, उडतारे 1, धोम 7, भोगाव 7, आसरे 1, शेलारवाडी 2, देगाव 6, खानापूर 5, एकसर 3, आसले 5 असे अर्ज दाखल झाले होते.









