सातारा / प्रतिनिधी :
सातारा-लोणंद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार आंदोलने केली जात होती. आता नुकतेच या मार्गाच्या कामास सूरूवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या नागरिकांनी चक्क ठेकेदार, अभियंता यांचा गुलाबाची फुले देऊन सत्कार करत जल्लोष केला.
सातारा-लोणंद या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. त्याकरता वडूथ, आरळे परिसरातील नागरिकांनी वारंवार आंदोलने केली होती. त्यानुसार नागरिकांच्या मागणीनुसार बांधकाम विभागाने रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. सातारा ते वडूथपर्यंत रस्त्याचे काम आलेले असताना सरपंच किशोर शिंदे व मदन साबळे यांच्या अग्रहास्त्व झाल्याचे सांगण्यात आले.
हायवे अधिकारी शत्रुघ्न काटकर व ठेकेदार धिरज यांनी छत्रपती शिवाजी चौकातील डांबरीकरण करून दिले. त्यांचे साईट इंजिनिअर पवन सिंग यांचा सत्कार घेऊन एनएचआय कंपनीचे आभार मानले. याबाबत मदन साबळे म्हणाले, रस्त्याचे काम उत्तम प्रकारे चालले आहे. तरी आमचे ध्येय आहे की प्रत्येक गावाने त्यांना सहकार्य करावे व कामाचा दर्जा व्यवस्थित करून घ्यावा. या रस्त्याला कुठल्याही लोकप्रतिनिधींनी मदत केली नाही. खासदार उदयनराजे भोसले व आमदार महेश शिंदे वगळता बाकी कोणीही या रस्त्याकडे बघायला सुद्धा आला नाही. या रस्त्यासाठी जर कोणीही मोलाचे सहकार्य केले असेल तर वडूथ येथील ग्रामस्थांनी.









