सातारा / प्रतिनिधी :
गांधी मैदान येथील राजवाडा चौपाटी आळुच्या खड्ड्यात हलवली आहे. त्यामध्ये अनेकांना जागा मिळाली नाही. व्यवसाय बंद असल्याने बँका, पतसंस्था यांच्या वसुलीच्या नोटीसा येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही न होता सातारा पालिकेने हॉकर्सबाबत केले आहे. त्यामुळे हॉकर्स धारकांनी सोमवारी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना घेराव घालून जाब विचारण्याचा निर्णय बैठकीत घेतला.









