प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात वाढत असलेला कोरोना आणखी वाढु नये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा याकरता दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवात हे विघ्न टाळण्यासाठी योजिलेल्या मुहूर्तावर बाप्पाची मूर्ती नेण्यासाठी गर्दी करू नका, गर्दी न करता लगेच मूर्ती न्या असे आवाहन पोलिसांनी गणेश भक्तांना केले असून शाहुपुरी पोलिसांनी शहरातील 38 मूर्ती विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
कोरोना रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. गेले चार महिने सण उत्सव बंद होते. आता अनलॉक होत असताना सातारा शहरात संख्या वाढत आहे. कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शाहुपुरी पोलिसांनी गणेश भक्तांना आवाहन केले आहे. तर मूर्ती विक्रेत्यांना नोटीस बजावले आहे. त्यांनी दिलेल्या नोटिसात आपण जी मूर्त तयार करणार अथवा विक्री करणार आहात ती मंडळांची चार फुटांची आणि घरगुती 2 फुटांची असावी, मूर्तीकारांनी शासनाच्या नियमानुसार मूर्ती बनवाव्यात, जेणे करून मूर्तीच्या उंचीवरून मंडळामध्ये वाद निर्माण होऊ नये, सातारा शहरात कोणत्याही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी.
मूर्ती या शाडूच्या मातीत बनवाव्यात, इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करता येईल. विक्री झाल्यावर उरलेल्या गणेश मूर्ती व तयार करताना राहिलेल्या साहित्याची विधिवत योग्य ती व्यवस्था करावी, मूर्ती उघड्यावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी, जोपर्यंत मूर्ती आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत जबाबदारी आपली आहे.त्यामुळे योग्य ती दक्षता घ्यावी, सार्वजनिक व घरगुती मूर्तीचे बुकिंग झाले असेल तर ताबडतोब मूर्ती घेऊन जाण्यास सांगणे, जेणे करून स्टोलवर सोशल डिस्टनन्सचे पालन होईल, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, स्टोल धारकांनी आपल्याकडे येणाऱ्या भाविकांच्या वाहनाकरता पार्किंगची सोय करावी, गर्दी होऊ नये याकरता स्वयंसेवक नेमावेत, कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









