प्रतिनिधी / नागठाणे
सर्वे नंबरचा दगड बदललेच्या कारणावरून (गणेशवाडी ता.सातारा) येथील वृद्धास मारहाण करण्यात आली.याबाबत येथीलच किरण दिलीप जाधव यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत आनंदराव हणमंत जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. या बाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदराव हणमंत जाधव (वय ६२) हे गणेशवाडी येथील रावळ्याचा माळ येथे शेतात काम करत होते. त्यावेळी किरण दिलीप जाधव हा तिथे आला. त्याने ‘तू सर्वे नंबरचा दगड का बदलास?’ असे म्हणून त आनंदराव हणमंत जाधव यांना शिवीगाळ व लथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जखमी केले. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपासपोलीस हवालदार रामचंद्र फरांदे करत आहेत.








