अंदाजे 1 लाख 50 हजारांचा गांजा : दोन युवक ताब्यात
प्रतिनिधी / सातारा
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डी.बी पथकाने धडक कारवाई करत मंगळवारी अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱया संशयित सागर गायकवाड (वय 24 रा. महालक्ष्मी मंदिरानजीक, गडकर आळी) यास व एका युवकास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 10 किलोच्या आसपास गांजा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूपुरी डीबी पथकातील पोलीस नाईक अमित माने यांना गोपनिय सुत्राकडून एक इसम दुचाकीवर गांजा विक्रीसाठी घेवून येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार शाहूपुरी पोलीसांनी आणि पथकांने सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गडकर आळी येथे छापा टाकला. यावेळी संशयित सागर गायकवाड यांच्याकडील पोत्यात 10 किलो गांजा प्लॉस्टिकच्या 5 पिशव्यात गुंडाळून विक्रीसाठी आणलेले आढळून आले. या गांजाची किंमत अंदाजे 1 लाख 50 हजार असल्याची प्राथमिक माहिती शाहूपुरी पोलीसांकडून देण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.









