औंध / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस
बाळासाहेब लांडगे यांची खेलो इंडिया आयडेंटिफिकेशन कमिटीच्या पश्चिम विभाग झोनल कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
भारतीय खेल प्राधिकरणाने लांडगे यांच्या कुस्तीक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ही निवड केेली आहे.
पश्चिम विभाग अंतर्गत छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्र आदी राज्यांचा समावेश आहे. लांडगे हे महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचेही सरचिटणीस आहेत. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्यकारणी सदस्य तसेच कुस्तीशौकिनांनी अभिनंदन केले आहे.









