प्रतिनिधी / वाई
वाई तालुक्यातील खानापूर येथील फाट्यावर तीन घरे अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि.22 रोजी रात्री 11 ते दि.23रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने किरण राजेंद्र जाधव यांच्या घरातील सॅमसंग कंपनीचा टीव्ही, बबन गंगाराम जाधव यांच्या घरातील 5 हजार रुपयांची रोकड चोरून नेली तर महेंद्र विनायक जाधव यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला. ही बाब सकाळी निदर्शनास आल्याने याची माहिती भुईंज पोलीस ठाण्यास दिली. महेंद्र जाधव यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलीस नाईक जाधव तपास करत आहेत.









