नवारस्ता/प्रतिनिधी
पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा तातडीने मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी ढेबेवाडीत मंजूर करण्यात आलेले ऑक्सिजन बेडसहित 35 खाटांचे कोवीड हॉस्पिटल येत्या आठ दिवसांत सुरू करा. असे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले .
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या कोवीड हॉस्पिटलची मंत्री देसाई यांनी पाहणी केली यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसीलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय डोंगरे, सहाययक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांची उपस्थिती होती.
दरम्यान गुराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी यावेळी कोवीड हॉस्पिटलसाठी आवश्यक असणार्या आरोग्य सुविधा, औषधे, उपकरणे, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आदी विषयी सविस्तर माहिती घेऊन स्वतः पाहणी केली आणि अत्यावश्यक सुविधेअभावी पाटण तालुक्यातील रुग्णांची हेळसांड न होण्यासाठी कोवीड हॉस्पिटल तातडीने आठ दिवसांत सुरू करण्याचे आदेश दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









