प्रतिनिधी/ कराड
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सातारा आणि कोल्हापूर जिल्हय़ातील खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱया गोरगरिब जनतेसाठी कोरोनावर उपचारासाठी वापरली जाणारी रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत. शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे ही इंजेक्शन सुपुर्द करण्यात आली.
शरद पवार यांनी कोरोना महामारीत या आजारावर उपचारासाठी प्रभावी ठरणारी रेमडेसीवीर इंजेक्शन गरीब जनतेसाठी उपलब्ध केली आहेत. पुणे जिल्हय़ात बारामती, पिंपरी चिंचवडसह अन्य भागात त्यांनी ही इंजेक्शन दिली होती. आजच्या दौऱयात त्यांनी सातारा व कोल्हापूरसाठी ही इंजेक्शन दोन्ही जिल्हाधिकाऱयांकडे सुपुर्द केली. या मदतीबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पवारांचे आभार मानले.









