वार्ताहर / देशमुखनगर
सातारा तालुक्यातील अंगापूर वंदनची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच १६ लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या वाढत्या रूग्ण संख्येने अंगापूरकर हादरले आहेत. कोरोनाचा वाढता शिरकाव रोखण्यासाठी ग्राम दक्षता कमीटीने दहा दिवस संपूर्ण गांव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंगापुरात सोळा जुलैच्या दरम्यान पहिला कोरोना बांधित रूग्ण सापडला. पाचच दिवसात त्यांचे अतिसहवासातील दोन लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान दोनच दिवसात त्यापैकी एका कोरोना बांधितांच्या घरातील सहा लोकांना कोरोनोची बांधा झाल्याने त्याचा रिपोर्टर पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे एकाच घरातील कोरोना रूग्ण संख्या सात झाली होती. तर गांवची एकूण रूग्ण संख्या नऊ झाल्याने नागरीकासह परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान त्या सर्व बांधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. अंगापूरातील रूग्णाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याने नागरीकांनी व प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला होता.
कोरोनाची साखळी तुटुन मुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच गांवातील एका ८३ वर्षांच्या नागरीकाला दम्याचा त्रास होत असल्याने त्याना सातारा येथे खाजगी दवाखान्यात दखल करण्यात आले होते. तेथे त्याना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे.त्यांचेवर सातारा येथे उपचार सुरू आहेत.
त्यांचे आतिसहवासातील दोघांना कोरोनाची बांधा झाली व त्यांच रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दरम्यान वर्णे येथे सासर असणार्या परंतु अंगापूर येथे वास्तव्य असणार्या ६० वर्षीय महिलेला त्रास होत असल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा तीन दिवसापूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एक एक करीत कोरोनाची साखळी वाढत असल्याने आरोग्य विभागाने तात्काळ पुन्ह स्वॅब कॅम्पचे आयोजन केले .या कोरोना टेस्ट स्वॅब कॅम्पमध्ये कोरोना बांधितांच्या सहवासातील ५० नागरीकांचे स्वॅब घेण्यात आले होते.त्यामधील शनिवारी रात्री उशीरा १६ लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गांवातील एकूण कोरोना रूग्ण संख्या २९ झाली आहे.तर नऊ लोक कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र १६ लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोरोना मुक्तीकडे वाटचाल न होता कोरोनाचा हॉटस्पॉट होत असल्याने परीसरासह नागरिक पुन्हा हादरले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








