सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषदेतील कोरोनाबळीच्या वारसांना शासकीय योजनेनुसार नुकताच 50 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी कार्यालयातून यासंदर्भात माहिती देण्यात आली.
शासनाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी औषधोपचाराची सुविधा केली आहे. तसेच ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदतही देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील पहिल्या कुटुंबास अशा प्रकारची मदत नुकतीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या सहकार्याने देण्यात आली.









