● एक महिन्यात तिप्पट रुग्ण
● कोरोनामुक्तीचे प्रमाण 50 टक्के
● कराड तालुक्यातील स्थिती गंभीरच
● तीन बाधितांचा मृत्यू
● जिल्हय़ातील हॉस्पिटल्स फुल्ल
प्रतिनिधी/सातारा
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱया टप्प्यात अनलॉक झाल्यानंतर जिल्हय़ात कोरोनाची स्थिती अधिकच गंभीर झाली. शहरांसह ग्रामीण भागात कोरोना बाधित आढळून येवू लागले असून दि. 1 जुलै ते 31 जुलै या एक महिन्याच्या कालावधीत रुग्णसंख्या तिप्पट झाली आहे. 1 जुलै रोजी एकूण रुग्ण संख्या 1107 होती तर 31 जुलै रोजी एकूण बाधितांची संख्या 4 हजार 52 झाली होती. जुलै महिन्यात बाधितांच्या संख्येने उसळी घेतली असून त्यावर केलेला दहा, पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनचा उताराही चालला नाही. उलट लॉकडाऊन काळात बाधितांची संख्या हजार ते बाराशेच्या घरात गेली. शासकीय तपासणीबरोबर खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची तपासणी होवू लागल्याने आतापर्यंत 28 हजार 425 जणांची तपासणी जिल्हय़ात झालेली आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात खाजगी लॅब अहवालात 21 बाधित तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात एन सी सी एस 80, आय आय एस ई आर 5, आघारकर 12, अँटी जन टेस्ट ( RAT) 45 असे सर्व मिळून 142 जण बाधित आहेत. तर दिवसभरात 44 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 168 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर खटाव 1 व वाई तालुक्यातील प्रत्येकी 2 असे एकूण 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्हय़ात जुलै महिन्यात तपासणींचा वेग वाढवण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढली असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले असून त्यामध्ये सौम्य, मध्यम आणि काहीच लक्षणे नसल्याचे रुग्ण असल्याचे सांगितले आहे. मात्र बाधितांची संख्या वाढल्याने हॉस्पिटल्ससह कोरोना केअर सेंटर्स हाऊसफुल्ल झाली असून आरोग्य यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे मार्केटचे टायमिंग सकाळी 9 ते 7 करण्यात आले असले तरी काही नागरिकांकडून आज देखील नियमांचे पालन होत नसल्याने जिल्हावासियांनी काटेकोरपणे नियम पाळून कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे.
44 नागरिकांची कोरोनावर मात
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 44 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये
खंडाळा तालुक्यातील कबुलेवाडी, शिरवळ 32 वर्षीय पुरुष, 29, 31, 28 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक, 7 वर्षीय बालिका, तळेकरवस्ती 35 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालक, 60 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील कण्हेर 72 वर्षीय पुरुष, तामजाईनगर 1 वर्षाचा बालक, 66 वर्षीय पुरुष, रामकृष्णनगर 40 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन 44 वर्षीय पुरुष, 37, 36 वर्षीय महिला, 8 वर्षाची बालिका, शेळकेवाडी येथील 40 वर्षीय महिला, 18 वर्षाची युवती, 12 वर्षाची मुलगी, 15 वर्षाचा मुलगा, शिवाजीनगर, शाहुपूरी 24 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला.
माण तालुक्यातील आंधळी येथील 65 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील पाचवड येथील 50 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, बावधन 70 वर्षीय पुरुष, शेंदूरजणे 48, 30 वर्षीय पुरुष, पसरणी 65 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील वडूज 29, 23, 24, 28 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी 60 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील सायगांव 34, 72 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, दापवडी 52, 22, 74 वर्षीय महिला, 20, 54, 24 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
सातारा तालुक्यातील कण्हेर 72 वर्षीय पुरुष, तामजाईनगर 1 वर्षाचा बालक, 66 वर्षीय पुरुष, रामकृष्णनगर 40 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन 44 वर्षीय पुरुष, 37, 36 वर्षीय महिला, 8 वर्षाची बालिका, शेळकेवाडी येथील 40 वर्षीय महिला, 18 वर्षाची युवती, 12 वर्षाची मुलगी, 15 वर्षाचा मुलगा, शिवाजीनगर, शाहुपूरी 24 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला.
माण तालुक्यातील आंधळी येथील 65 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील पाचवड येथील 50 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, बावधन 70 वर्षीय पुरुष, शेंदूरजणे 48, 30 वर्षीय पुरुष, पसरणी 65 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील वडूज 29, 23, 24, 28 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी 60 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील सायगांव 34, 72 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, दापवडी 52, 22, 74 वर्षीय महिला, 20, 54, 24 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
बळींचा आकडाही वाढतोय
दि. 1 जुलै रोजी बळींचा आकडा 46 होता तर उपचारार्थ फक्त 318 रुग्ण होते. 31 जुलैपर्यंत बाधित, मृत्यूचा आकडा तिप्पट झाला आहे. ही स्थिती गंभीरच असून दि. 2 ऑगस्ट रोजी मृत्यूच्या एकूण आकडा 138 एवढा गंभीर असून तो रोखण्याबरोबरच बाधितांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनासह सर्वांना कंबर कसावी लागणार आहे.
रुग्ण वाढीचा वेग गंभीर होतोय
कराडमध्ये कोरोनामुक्तांचे प्रमाण चांगले असले तरी दररोज वाढत असलेली कोरोना बाधितांच्या संख्येने कराडकरांना चांगलेच गोंधळात टाकलेय. रविवार रात्रीच्या अहवालात एकटय़ा कराड तालुक्यात 58 बाधित समोर आलेत तर वाई 23, खंडाळा 20, खटाव 15, कोरेगाव 13, जावलीत 9, सातारा 7, पाटण 7, महाबळेश्वर 5 तर माणमध्ये 5 बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. या वाढत्या संख्येने कोरोना केअर सेंटर्ससह हॉस्पिटल्स फुल्ल होवू लागली असून आजमितीस जिल्हय़ात 2 हजार 84 जणांनी कोरोनावर मात केली असून 2 हजार 29 रुग्णांवर उपचार सुरु आहे. यामध्ये लक्षणांप्रमाणे रुग्णांचे विलगीकरण करुन उपचार सुरु असून नागरिकांनी घाबरुन न जाता नियम पाळून प्रशासनाला साथ दिली तर लवकरच जिल्हादेखील कोरोनामुक्तीकडे वाटचाल करु शकतो.
रविवारी रात्री अहवालात 168 बाधित
कराड तालुका : टेंभू 55, 30 वर्षीय महिला 28, 55 वर्षीय पुरुष 16 वर्षीय तरुण, शिवडे 23 वर्षीय महिला 29, 27 वर्षीय पुरुष, वडोली 48 वर्षीय पुरुष, उंब्रज 25 वर्षीय पुरुष 27 वर्षीय महिला 13 वर्षीय बालक, गोंडी 35 वर्षीय महिला, मनव 50 वर्षीय महिला 22 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी 46, 51, 40 वर्षीय पुरुष, कार्वे 60, 23 वर्षीय महिला, बुधवार पेठ 21, 22 वर्षीय तरुणी 40 वर्षीय महिला, मंगळवार पेठ 15, 16 वर्षीय बालक 38, 45 वर्षीय महिला 48, 50 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ 15 वर्षीय बालीका 11 वर्षीय बालक 40 वर्षीय महिला, मलकापूर 59 वर्षीय पुरुष. बुधवार पेठ 59 वर्षीय पुरुष, चोरे 33 वर्षीय पुरुष, इंदोली 25, 32, 31 वर्षीय पुरुष, कालवडे 21 वर्षीय तरुण, 53 वर्षीय महिला, कार्वे नाका 32 वर्षीय महिला, कृष्णा मेडिकल कॉलेज 1 डॉक्टर, कोयना वसाहत 35 वर्षीय महिला 3 वर्षीय बालीका, नारायणवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, शारदा क्लिनिक 65, 26, 40, 51 वर्षीय महिला 61, 85, 87, 23 वर्षीय पुरुष, उंब्रज 1 पुरुष, वडगाव 33 वर्षीय पुरुष, वाठार 35 वर्षीय पुरुष, सह्याद्री हॉस्पिटल 34, 60 वर्षीय पुरुष.
वाई तालुका : पाचवड 51 वर्षीय पुरष, रविवार पेठ 65 वर्षीय महिला 75, 55 वर्षीय पुरुष, पसरणी 28 वर्षीय महिला 47 वर्षीय पुरुष, बावधन 62 वर्षीय पुरुष 55, 85 वर्षीय महिला, शेंदूरजणे 26, 20, 60 वर्षीय महिला 4 वर्षीय बालक 56 वर्षीय पुरुष, ओहोळी 56, 28 वर्षीय पुरुष 54 वर्षीय महिला 8 वर्षीय बालक, शहाबाग 28 वर्षीय महिला 29, 35, 30 वर्षीय पुरुष, देगाव येथील 24 वर्षीय पुरुष.
सातारा तालुका : गडकरआळी 50 वर्षीय महिला, बुधवार पेठ 71 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ 60 वर्षीय महिला, सातारा 75 वर्षीय महिला, काशीळ 38 वर्षीय महिला, देशमुख कॉलनी 21 वर्षीय पुरुष, दत्तनगर 27 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी 20, 45 वर्षीय महिला 52, 40 वर्षीय पुरुष, समर्थ विश्व 44 वर्षीय पुरुष, सुंदरनगर 45 वर्षीय पुरुष, अतीत 50 वर्षीय पुरुष 33 वर्षीय महिला 14 वर्षीय बालक, केसुर्डी 28 वर्षीय पुरुष,
जावली तालुक्यातील खर्शी येथील 20 वर्षीय तरुणी, दुदुस्करवाडी 25, 55, 3, 47 वर्षीय पुरुष 35, 47, 20, 35 वर्षीय महिला 17 वर्षीय बालक.
खटाव तालुका : मायणी 45, 25, 24, 45, 29 वर्षीय महिला 12, 9, 12 वर्षीय बालिका 3 वर्षीय बालक 23, 25 वर्षीय पुरुष, वडूज 52 वर्षीय महिला 23 वर्षीय पुरुष, येराळवाडी 54 वर्षीय पुरुष, कातरखटाव 24 वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुका : कुमठे 66 वर्षीय महिला, चिमणगाव 50 वर्षीय महिला, चिंचली येथील 35 वर्षीय पुरुष, पळशी 33 वर्षीय पुरुष, देऊर 82 वर्षीय पुरुष, कुमठे 65 वर्षीय पुरुष, पिंपोडे (बु ) 36, 44, 43, 38, 58 वर्षीय पुरुष, पेठ किन्हई 70 वर्षीय पुरुष, सुरली 65 वर्षीय महिला.
पाटण तालुका : मल्हारपेठ 50, 58 वर्षीय पुरुष 46 वर्षीय महिला, नाडे 22 वर्षीय तरुण, कुसरुंड 43 वर्षीय पुरुष, भुरभुशी 25 वर्षीय महिला, नेरले 36 वर्षीय महिला.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 55, 50, 23 वर्षीय पुरुष 45, 20 वर्षीय महिला. माण तालुक्यातील पुळकोटी 30 वर्षीय महिला, म्हसवड 7 वर्षीय बालिका 3 वर्षीय बालक, वरकुटे मळवडी 60, 29 वर्षीय महिला.
खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 46 बाधित
27 जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान जिह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 15 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे कळविले आहे. यामध्ये सातारा 10, वाई 1, माण 2, महाबळेश्वर 1, कराड 1 तर रविवारी दिवसभरात 21 जणांचे असे मिळून एकूण 46 अहवाल बाधित झालेले आहेत.
3 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणाल सातारा येथे खटाव 72 वर्षीय पुरुष, कवठे ता. वाई 70 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
306 जणांचे नमुने तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 20, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 41, खंडाळा 75, पानमळेवाडी येथील 75, मायणी 28, महाबळेश्वर 17, खावली येथील 50 असे एकूण तीनशे सहा नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 29042
एकूण बाधित 4430
एकूण कोरोनामुक्त 2184
मृत्यू 139
उपचारार्थ रुग्ण 2146
रविवारी
एकूण बाधित 178
एकूण मुक्त 44
एकूण बळी 03
Previous Articleकोरोना बळीची संख्या वाढल्याने सर्वत्र चिंता
Next Article विर्नोडा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला








