धरणातून ३४ हजार २११क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू, कोयना,कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नवारस्ता/प्रतिनिधी:
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीचा इशाऱ्यानुसार कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोविस तासांपासून कहर केला असल्याने कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी पहाटे पासून धरणाचे सर्व म्हणजे सहा ही वक्र दरवाजे साडे तीन फुटांनी उचलून कोयना नदी पात्रात प्रतिसेकंद ३४ हजार २११ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी कोयना नदीची पाणीपातळीत वाढ झाली असल्याने कोयना आणि कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने कोयना धरणाच्या पाणीपातळीत प्रतिसेकंद २५ हजार १६१ क्यूसेक्स ची पाण्याची आवक सुरू झाली असल्याने कोयना धरणाची जलपातली नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सर्व म्हणजे सहा ही वक्र दरवाजे साडे तीन फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ३४ हजार २११ कटुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान पावसाचा जोर आणि धरणातील विसर्ग यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याने कोयना आणि कृष्णा काठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Previous Articleनगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
Next Article दुष्काळी खानापूर तालुक्यात पावसाची दिवसात शंभरी









