प्रतिनिधी / नवारस्ता
कोयना परिसर आज मंगळवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरला.दरम्यान या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापन सुत्रांकडून देण्यात आला.
कोयना परिसरात आज मंगळवारी सकाळी ७-१६ वाजता भूकंपचा धक्का बसला.या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर २.६ इतकी नोंद झाली असून या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून पासून आठ किलोमीटर अंतरावर चिपळूण तालुक्यातील अलोरे गावच्या दक्षिण दिशेला सहा किलोमीटर अंतरावर आहे तर या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली चार किलोमीटर आहे.
दरम्यान कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने नुकतीच १०० टीएमसी चा टप्पा पार केला असतानाच कोयना परिसराला भूकंपाचा धक्का बसल्याने घबराट निर्माण झाली मात्र या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका झाला नसून कोयना धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा कोयना व्यवस्थापन सूत्रांकडून देण्यात आला.
Previous Articleजगभरातील कोरोनाबळींची संख्या 8.5 लाखांवर
Next Article शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची बाधा








