वार्ताहर / कास
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह बामणोली कास परिसरात जुन जुलै महिन्यात मान्सुनने हालक्या स्वरूपात हजेरी लावली होती. मात्र ऑगस्ट माहिन्याच्या सुरवातीपासुन पावसाने दमदार हाजेरी लावली आहे. आज या परिसरात पावसाची मुसळधार सुरू आहे.
सुरुवातीचे दोन महिने पावसाच्या आगरात मान्सुनच्या पावसाने हालक्या स्वरूपात हाजेरी लावल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ठरणारी कोयना नदीसह उरमोडी कण्हेर तारळी आदी धरणे भरणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासुनच वरूणराजाने कृपादृष्टी दाखवत जोरदार हाजेरी लावल्याने दोन महीन्यात झालेली ऊणीव भरून काढत कोयना धरणाचा पाणी साठा तब्बल ७५ टिएमसीच्या पुढे नेऊन ठेवल्याने व मुसळधार पावसाची जोरदार हजेरी कायम असल्याने आता कोयना धरणासह अन्य धरणे पुर्ण क्षमतेने भरल्याशिवाय राहणार नाहीत यात शंकाच नाही.
मात्र गेल्या दोन दिवसापासुन पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले दुतडी भरुन वाहत असुन अनेक गावातील विज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे.
Previous Articleमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात
Next Article “प्रशासक कोण..?” उद्या होणार फैसला









