धरणातून ३ हजार ४५० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
नवारस्ता / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्यामुळे राज्याची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाचे रिव्हर स्विस गेट साडे तीन फुटांवर उघडुन धरणातून प्रतिसेकंद १ हजार ३०० क्यूसेक्स आणि पायथा विजगृहातून २१०० क्यूसेकअसे मिळून कोयना धरणातून एकूण ३ हजार ४५० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला असल्याची माहिती कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. फाळके यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना दिली.
धरणात मुबलक पाणीसाठा..
कोयना धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असुन आज शनिवार दिनांक ३ रोजी सकाळी ८वाजेपर्यत कोयना धरणाची पाणीपातळी २१२०.०५ फूट आणि ६४६.३०मीटर इतकी असून धरणात ६१.५९ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.









