शाहूपुरी : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक, साताराच्या वतीने दि. १२रोजी सकाळी ११ वाजता प्रथम तसेच थेट व्दितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश फेरी १ साठी ऑप्शन फॉर्मऑनलाईन मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
प्रथम वर्ष डिप्लोमा ऑप्शन फॉर्म मार्गदर्शन मेळाव्याकरिता गुगल मीट लिंक meet.google.com/dhf-xuue-faq व थेट ब्दितीय वर्ष डिप्लोमा ऑप्शन फॉर्म मार्गदर्शन मेळाव्याकरिता गुगल मीट लिंक meet.google.com/tgb-nqbx-aop चा वापर करावा. ऑनलाईन मेळाव्यामध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरावा, विद्यार्थ्यांनी कोणती दक्षता घ्यावी इ.बाबतचे सविस्तर मार्गदर्शन तज्ञ प्राध्यापकांकडून करण्यात येणार आहे. तरी सदर ऑनलाईन मार्गदर्शन मेळाव्यामध्ये इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. के.सी. शेख यांनी केले आहे.









