प्रतिनिधी/नागठाणे
कोपर्डे (ता.सातारा) येथून बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह कृष्णा नदीच्या पात्रात सापडला. नामदेव निवृत्ती कुलकर्णी (वय.७२)असे या इसमाचे नाव आहे. काल,गुरुवारी दुपारी हा मृतदेह आढळून आला.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव हे सोमवारी कोपर्डे येथील राहत्या घरातून निघून गेले होते. ते बराच वेळ झाली तरी घरी न आल्याने घरातील लोकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. शोध घेऊनही न मिळून आल्याने कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
गेली दोन दिवस नातेवाईक बेपत्ता नामदेव यांचा शोध घेत होते. गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी व पोलिसांनी महाबळेश्वर येथील ट्रेकर्सना शोधमोहिमेसाठी कोपर्डे येथे कृष्णा नदीपात्रात पाचारण केले. दुपारी ४ च्या सुमारास ट्रेकर्सना कृष्णा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस व ट्रेकर्सनी नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. याची फिर्याद अर्जुन निवृत्ती कुलकर्णी यांनी दिली असून पुढील तपास हवालदार बाजीराव पायमल करत आहेत.
Previous Articleसोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
Next Article कोल्हापूर : नॉन कोविड रूग्णांचा जीव टांगणीला!









